जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर प्रमोद रुले) | भारतीय जनता पार्टी महानगर जळगाव जिल्हा विश्वकर्मा योजना सेलची नवीन कार्यकारिणी १६ सप्टेंबर २०२६ रोजी जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार आणि जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, वस्त्राद्रीय उद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या नेतृत्वात तसेच विभाग संघटनमंत्री रवी अनासपुरे, खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश (राजुमामा) भोळे, आमदार मंगेशदादा चव्हाण, आमदार अमोलदादा जावळे, जिल्हाध्यक्ष दीपक प्रभाकर सूर्यवंशी यांच्या सूचनेनुसार श्री. संजय बाबुराव विसुपुते यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली आहे.
या नवीन कार्यकारिणीत श्री. संजय बाबुराव विसुपुते (जिल्हाध्यक्ष), उपाध्यक्ष म्हणून श्री. महेश लक्ष्मीनारायण वर्मा, श्री. संजय रामकृष्ण जगताप, श्री. संजय प्रभाकर दीक्षित, सरचिटणीस म्हणून श्री. संदीप अरुण डोलारे, श्री. अशोक अरुण शिंपी, चिटणीस म्हणून श्री. चंद्रकांत ल. पंधारे, श्री. अरुण बारी, श्री. विजय शेवाळे, तसेच सोशल मीडिया प्रमुख म्हणून श्री. एकनाथ गजानन खंबायत आणि प्रसिद्धी प्रमुख म्हणून श्री. प्रमोद राजेंद्र रुळे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून श्री. विनोद मधुकर दंडगव्हाळ, श्री. विजय सदानंद अहिरराव, श्री. योगेश मधुकर सोनवणे, श्री. सुनील रमेश आळदे, श्री. गोबा अरुण कुंभार आणि श्री. गणेश गोवर्धन सोनी यांची निवड करण्यात आली आहे.







