शहादा (विजय निकम) – आज (दि.५) कुणबी हृदय सम्राट कुणबी सेना संस्थापक अध्यक्ष मा. विश्वनाथ पाटील साहेब यांच्या आदेशावरून, कुणबी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. युवराज आबा पाटील साहेब यांच्या शिफारशीने व कुणबी सेनेचे उत्तर महाराष्ट्र (खान्देश) अध्यक्ष संदीपजी देवरे व धुळे जिल्हा प्रमुख संजयजी बोरसे यांच्या मार्गदर्शनाने अखिल भारतीय कुणबी सेना महाराष्ट्र राज्य, नंदुरबार जिल्हा संपर्क प्रमुख या पदावर गणेशराजे रघुनाथ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.
कुणबी सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा. प्रदीप हरड पालघर यांच्या हस्ते नंदुरबार शासकीय विश्राम ग्रुह येथे नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळेस कुणबी सेना नंदुरबार जिल्यातील शहादा, तळोदा, नंदुरबार येथील सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.







