आज आढळले २७६ कोरोनाबाधित; २ कोरोनाबाधितांचा मृत्यू
जळगाव (प्रतिनिधी) – आज (दि.५) सायंकाळी कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅब तपासणीचा अहवाल आल्यानंतर २७६ कोरोनाबाधित आढळून आले तर दुसरीकडे ५०१ कोरोनाबाधितांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनावर यशस्वीपणे मात करणाऱ्या रुग्णांची संख्या ४४ हजार ३०२ झाली आहे.
आज आढळलेल्या २७६ कोरोनाबाधितांमध्ये जामनेर तालुक्यात सर्वाधिक १०६ तर जळगाव शहर -७३, जळगाव ग्रामीण-११, भुसावळ-३१, अमळनेर-१०, चोपडा-६, पाचोरा-१, भडगाव-१, धरणगाव-३, यावल-३, एरंडोल-५, रावेर-१०, पारोळा-०, चाळीसगाव-८, मुक्ताईनगर-२ आणि अन्य जिल्हा ६ असा समावेश आहे.
दरम्यान, आज दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा १ हजार २०६ झाला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ४ हजार २०३ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.







