धरणगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – आज महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळाची मिटींग प्रदेशाध्यक्ष विवेक ठाकरे,कोअर कमेटी सदस्य ईश्वर मोरे,जिल्हाध्यक्ष कैलास शेलोडे व जिल्ह्यातील इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडली सदर मिटिंग मध्ये संघटनेच्या ध्येय धोरणावर व समाजसेवेवर चर्चा करण्यात आली.त्यांनंतर पदाधिकारी निवड कार्यक्रम घेण्यात आला.
प्रदेशाध्यक्ष विवेक ठाकरे,ईश्वर मोरे,जिल्हाध्यक्ष कैलास शेलोडे यांनी जिल्हासंघटक पदी छोटु जाधव तर कन्हैया रायपूरकर यांना जिल्हाउपाध्यक्ष म्हणून नियुक्ती पत्र दिले तसेच तालुकाध्यक्ष अशोक बंडू जाधव व शहराध्यक्ष गणेश सुभाष जाधव यांची पुन्हा फेरनिवड करण्यात आली.युवा संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी प्रशांत बच्छाव(पिंप्री) तर युवा शहराध्यक्ष म्हणून विनोद रोकडे व लॉंड्री असोशियन अध्यक्ष पदी नितीन दगडू जाधव यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
सदर बैठकीस जिल्हाकार्याध्यक्ष रमेश ठाकरे,भुसावळ तालुकाध्यक्ष नरेंद्र वाघ,मनीष बाविस्कर,दीपक मांडोळे,गणेश जाधव,प्रमोद जाधव,सुरेश जाधव,भुषण जाधव व नवनियुक्त पदाधिकारी सह इत्यादी समाज बांधव उपस्थित होते.







