डोंगर कठोरा रस्ता बांधकाम करण्याची शिवस्मारक युवा संघर्ष समितीसह ग्रामस्थांची मागणी

dongar-kathoda-road

यावल (सुरेश यावल) – यावल फैजपुर रोडवरील चितोडे गांवाच्या अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या कठोरा गावाकडे जाणाऱ्या डोंगर कठोरा फाटा रस्ता हा संपूर्ण नवीन बांधकाम करण्याची मागणी शिवस्मारक युवा संघर्ष समिती आणि ग्रामस्थांतर्फे करण्यात आली आहे.

 

डोंगर कठोरा फाटा हा रस्ता डोंगर कठोरा गांवापर्यंत अतिशय खराब झाला असून या रस्त्यावर दुचाकी किंवा चारचाकी चालवणे खुपच कठीण झाले आहे त्यामुळे अपघातही होण्याची दाट शक्यता आहे.

 

डोंगर कठोरा गांवालगतच डोंगरदे हे तिर्थक्षेत्र प्रसिद्ध असून, महिला महाविद्यालय,जिनिंग मिल तसेच शेती वाहतुकीसाठी अनेक वाहनांची सतत वर्दळ सुरु असते.हा रस्ता अतिशय खराब झालेला असल्यामुळे नवीन करण्यात यावा अशी मागणी शिवस्मारक युवा संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र रवींद्र सरोदे तसेच ग्रामस्थ यांनी आमदार शिरीषदादा चौधरी यांना लेखी निवेदन देऊन केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here