चिनावल ते उटखेडा रस्ता झाला खड्डामय; वाहनधारकांची प्रवास करतांना वाढली डोकेदुखी

chinawal-untkheda-road

रावेर (प्रतिनिधी हमीद तडवी) – तालुक्यातील उटखेडा ते चिनावल या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असुन ह्या रस्त्यात जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असल्याने ह्या चिनावल ते उटखेडा रस्त्याचे तीन तेरा नऊ अठरा वाजले असुन हा रस्ता मोठमोठ्या खड्यांमुळे अपघातास कारणीभुत ठरत आहे, या रस्त्याचे मोठमोठ्या खड्डयांत रुपांतर होऊन या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे,या रस्त्याने प्रवास करीत असतांना रस्त्यात खड्डा आहे,का खड्यात रस्ता हेच समजले जात नाही,म्हणुन बरेचशे वाहनधारक या रस्त्याने प्रवास करणे टाळतात,या खड्यांमुळेच या रस्त्याने प्रवास करणे जिकरीचे झाले आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की उटखेडा ते चिनावल हा रस्ता किसान मार्ग म्हणुन ओळखला जातो,कारण या उटखेडा ते चिनावल रस्त्याचा आजुबाजुचा संपुर्ण परिसर हा बागायती शेती पिकांनी बहरला आहे,या शेती शिवारात केळी,हळद,आले,कपाशी सारखी खुप पिके घेतली जातात,यामुळेच हा उटखेडा ते चिनावल रस्ता शेतकरी मार्ग म्हणुन ओळखला जातो,देशाच्या विविध राज्यांतुन या उटखेडा-चिनावल शेतीशिवारात ट्रक,मोठी वाहने केळी,हळद अशी बागायती पिके घेण्यासाठी शेतकऱ्याच्या शेताच्या बांधावर जाण्याचा हाच एकमेव मार्ग आहे,ह्या शिवारात केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते,यामुळे शेतकऱ्यांची वाहने,बैलगाडी,ट्रक्टर,ट्रक, दुचाकी वाहनांची नेहमी या रस्त्याने वर्दळ असते,आणि सद्धया स्थितीत या रस्त्याच्या दयनीय अवस्थामुळे शेतकरी,मजुरांसह,वाहनधारकांना आपली वाहने कशीतरी डुलत-डुलत चालवावी लागत आहे.

 

या रस्त्याबाबतीत संबधित बांधकाम विभागाला संपुर्ण खबर, माहिती असल्यावरही जाणीव पुर्वक दुर्लक्ष का करीत आहे ? असा सवाल परिसरातील जनतेने,शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे आणि संबधित विभागाचे अधिकारी व पदाधिकारी हे शेतकरी,मजुर वर्गाची भावना दुखावण्याचे काम करीत असल्याचे परिसरातील जनतेकडुन,व शेतकरी, मजुर वर्गाकडुन बोलले जात आहे.chinawal-untkheda

 

तरी या रस्त्याच्या संपुर्ण प्रकाकाकडे आणि गंभीर दयनीय अवस्थेकडे संबधितविभागाने गाँभीर्याने लक्ष देऊन जिल्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या उटखेडा ते चिनावल रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण करावे अशी रास्त स्वरुपाची मागणी परिरातील जनतेकडुन,शेतकऱ्यांकडुन,व वाहनधारकांकडुन संबधित विभागाच्या बांधकाम अधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here