धरणगाव (प्रा.पी.एम.पाटील) – महाराष्ट्रातील केस कर्तनालय मार्च महिन्यापासून कोरोना महामारी मुळे बंद होती त्यांना अटी शर्ती
घालून शासनाने परवानगी दिली असून नाभीक समाजाला त्यामुळे दिलासा मिळाला आहे.
जळगांव येथील अमोल हेअर आर्ट कालीदास चेंबर गणेश कॉलनी रोड वरील दुकानात भेट दिली असता त्या ठिकाणी सोशल डीस्टीशनचे पालन करून ठरावीक अंतरावर ग्राहक बसले होते.व तीन ग्राहक कर्तनासाठी चेअरवर बसले होते.अनेक वर्षांपासून आपल्या मनपसंत दुकानातुन व ठराविक मालका कडून केस कर्तनासाठी नाशिक व धरणगांव येथील रहिवासी भरत भाटिया हे खास करून जळगांव केस कर्तनासाठी आले होते त्यांच्याशी व सलून मालक भागवतराव सोनवणे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले चार महिन्यापासून दुकाने बंद असल्यामुळे नाभीक समाजातील व्यवसाय करणारे नाभीक बांधव अतिशय अडचणीत आले होते.परंतु कोरोना महामारी मूळे खऱ्या अर्थाने आमच्या व्यवसायावर परिणाम झाला होता.
आमची इच्छा असून सुद्धा आम्ही शासनाच्या पूर्ण परवानगी शिवाय व्यवसाय कसा सुरू करावा अनेक अडचणी येत होत्या परंतु दिनांक २८जुन पासून अटी शर्ती टाकून फक्त केस कर्णसाठी परवानगी देण्यात आली आहे. त्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला हातावर सॅनिटायझर चेअरवर प्रत्येकाच्या अंगावर रुमालावर कपड्यावर स्प्रे मारून मगच आत प्रवेश दिला जात होता. ग्राहक व मालकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले व सलून वाल्यानी शासनाचे आभार मानले.







