किन्ही येथे गावठी हातभट्टीवर तालुका पोलिसांचा छापा

gavathi-daru

भुसावळ (प्रतिनिधी गिरीश पवार) – तालुक्यातील किन्ही येथे गावठी हातभट्टीवर तालुका पोलिसांनी सोमवारी सायंकाळी अचानक छापा टाकला.

 

तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील किन्ही शिवारात नाल्या जवळ सार्वजनिक जागी ईसम नामे रतन काशीनाथ कोळी रा कीन्ही हा गावठी हटभट्टीची दारू गाळण्याचे गूळ मोह नवसागर मिश्रित द्रव्य कच्चे रसायन 5 ड्रम त्यात 900 लिटर रसायण व गावठी हटभट्टीची 25 लिटर तयार दारू अंदाजे किंमत 31250 /- रु चे मालासह मिळुन आल्याने. त्यांचे विरुद्ध प्रोव्ही कायदा अन्वये कलम 65 फ, ब, क, ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे

 

 

सदरची कारवाई पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार सपोनि अमोल पवार पोहेकाँ विठ्ठल फुसे,पोह/अजय माळी सुनील चौधरी होम अमोल जयकर, जगदीश पाटील यांनी केली आहे.gavathi-daru-1

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here