शहादा (विजय निकम) – शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथील मोहन सदाशिव मराठे वय 37 या तरुणास एका गुन्ह्यासंदर्भात संशय बळावल्याने दोंडाईचा पोलिसांनी चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतले परंतु सकाळी चौकशीसाठी गेलेल्या तरुणाचा रात्री दोंडाईचा शहरालगत शहादा रस्त्यावर पीरबल्ली येथे संशयास्पद रित्या मृतदेह आढळून आला.
याबाबतची माहिती मोहनच्या मित्रपरिवाराने पोलिसांना कळविली असता पोलिसांनी माहिती मिळवून देखील मोहन च्या मृत्युची तपासणी करण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली नाही यामुळे सकाळी पोलिसांसोबत गेलेल्या मोहन चा संशयास्पद संध्याकाळी मृत्यू झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत
अखेर स्थानिक पोलिस मोहन चा मृत्यू संदर्भात हलगर्जीपणा करत असल्याचे लक्षात येताच मोहनच्या मित्रपरिवारातून एका मित्राने थेट धुळे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक चिन्मय पंडीत यांच्याशी संपर्क साधला.
पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी दोंदाईचाकडे धाव घेतली व मृत झालेल्या मोहन चा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून या प्रकरणामध्ये पोलीस प्रशासनातर्फे हलगर्जीपणा झालाय का याचा देखील तपास पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी करणार असल्याचे पत्रकारांशी व मृत झालेल्या मोहनच्या नातेवाईक व मित्र पवारांशी बोलताना सांगितले. परंतु संपूर्ण दोंडाईचा शहरांमध्ये पोलिसांसोबत सकाळी गेलेल्या मोहन चा रात्री संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.







