रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे साडेसात लाख मे.टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट – आमदार. अशोकबापु पवार

ghodganga-sugar

पुणे (प्रतिनिधी सुनिल ज्ञानदेव भोसले) – रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या २४ व्या बॉयलर अग्निप्रदीपन व गव्हाणपुजन आज करण्यात आले.

 

त्यावेळी रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष. आमदार.मा.अशोकबापु पवार यांनी (न्हावरे- शिरूर) याप्रसंगी अध्यक्ष पदावरून बोलत होते, त्यांनी याप्रसंगी स्थानिक पत्रकार, कारखान्याचे संचालक व शेतकरी बांधवांच्या हस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकून यावर्षीच्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला त्यावेळी कारखान्याचे अध्यक्ष आमदार अशोकबापु पवार यांनी सांगितले कि रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे साडेसात लाख मे.टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे.

 

 

कारखान्याचे संचालक. वाल्मिकराव नागवडे व त्यांच्या पत्नी सौ.लतिका नागवडे यांच्या हस्ते बॉयलरचे अग्निपुजन करण्यात आले. त्यावेळी कारखान्याचे अध्यक्ष. कार्यसम्राट अशोकबापु पवार म्हणाले मागील सरकारने कारखान्याबरोबर वीज खरेदी करार वेळेवर न केल्यामुळे कारखान्यास मोठा आर्थिक फटका बसला आहे परिणामी त्यामुळे सद्या कारखान्याला आर्थिक संकटाला समोरे जावे लागत आहे. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री.मा.उध्दव ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री.मा.अजित पवार साहेब, सहकारमंत्री. मा.बाळासाहेब पाटील साहेब, राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष. विद्याधर अनास्कर साहेब यांच्या माध्यमातुन शासन स्तरावर प्रयत्न करून ही नुकसान भरपाई भरुन काढण्यासाठी संचालक मंडळाचे प्रयत्न चालु आहे. या वेळच्या गळीत हंगामात घोडगंगा कार्यक्षेत्रात उस मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. यंदाच्या गळीत हंगामात साडे सात लाख मे.टन उसाचे गाळपाचे उदिष्ट पुर्ण केल्यास कारखाना पुर्वी प्रमाणे सुस्थितीत येऊन कारखान्याचे संस्थापक रावसाहेबदादा पवार यांचे स्वप्न साकार करता येणार आहे.

 

 

कारखान्याचे सभासद व शेतकरी बांधवांनी नेहमीच कारखान्याच्या पाठीशी राहुन केलेले सहकार्य लाख मोलाचे आहे. ही संस्था सभासदांच्या मालकीची आहे. संचालक मंडळ हे विश्वस्त म्हणुन काम पाहत असते. दरम्यान संपुर्ण जग कोरोनाच्या संक्रमातुन जात असताना अशा संकटाच्या काळात आपले व आपल्या संस्थेचे हित डोळ्यासमोर ठेवून सभासद व शेतकरी बांधवांनी आपला उस घोडगंगा सहकारी साखर कारखाण्यास गाळपा साठी देऊन सहकार्य करावे. असे अवाहन कारखान्याचे अध्यक्ष आमदार अशोक बापु पवार यांनी केले.

यावेळी घोडगंगाचे उपाध्यक्ष श्री. रंगनाथ थोरात, संचालक.प्रा.सुभाष कळसकर, बाबासाहेब फराटे, संतोष रणदिवे, जगन्नाथ जगताप, अर्जुन कोंडे,सुदाम साठे, प्रशांत होळकर, बाळासाहेब ढमढेरे, उत्तम सोनवणे, पोपटराव भुजबळ,बिरा शेंडगे, शालन काळे, मनिषा सोनवणे, सचिन म चाले, दिलीप मोकाशी, नरेंद्र माने, रामअण्णा माने,, दत्तात्रय फराटे, अनिल कांबळे, कार्यकारी संचालक प्रविण शिंदे, यांच्यासह पत्रकार, आधिकारी, कर्मचारी, सभासद शेतकरी बांधव उपस्थित होते, या कार्यक्रमात कारखान्याचे माजी कार्यकारी अधिकारी संचालक दिवंगत संभाजीराव पाटील यांना उपस्थितांच्या वतीने सामुहिक श्रध्दांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मंगेश ढवळे यांनी केले उपस्थितांचे आभार कारखान्याचे संचालक दिलीप मोकाशी यांनी मानले.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here