विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर दिघावकरांचा दणका

pratap-deghovkar

व्यापाऱ्यांकडे अडकलेले १४ शेतकर्‍यांचे 2 कोटी रुपये मिळाले परत

 

नाशिक (विशेष प्रतिनिधी कुबेर जाधव) –  ‘शेतकऱ्यांचा माल घेऊन पैसे देण्यास टाळाटाळ करण्याच्या १४ प्रकरणांत एका व्यापाऱ्याने साडेसात लाख रुपये दिले असून, उर्वरित १३ प्रकरणांत संशयित व्यापाऱ्यांनी दहा दिवसात पैसे देण्याची तयारी दर्शविली आहे. एकूणच विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांच्या दणक्यानंतर साधारण आठवडाभरात जिल्ह्यात १४ शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

 

 

फसवणुकीच्या घटना टाळण्यासाठी प्रथम प्राधान्य दिलेल्या नवनियुक्त विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी प्राधान्य दिले आहे. पाचही जिल्हा पोलिस अधीक्षकांना त्यांनी त्वरित कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात १४ प्रकरणे उघडकीस आली आहेत.

अप्पर पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील दिंडोरी, निफाड, सिन्नर व नाशिक तालुक्यांतील फसवणुकीच्या तक्रारीचा आढावा घेत फसवणुकीच्या तक्रारी दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार वणी पोलिस ठाणे चार गुन्हे, पिंपळगाव- दोन, दिंडोरी- चार, लासलगाव- एक, सिन्नर एमआयडीसी-एक, सटाणा- एक व नाशिक तालुका- एक याप्रमाणे जिल्ह्यात १४ फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. या फसवणूक प्रकरणातील संशयिताशी संपर्क साधून शेतकऱ्यांचे पैसे परत करण्याच्या सूचना ग्रामीण पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत. त्यानंतर दिंडोरी पोलिस ठाण्यातील गुन्ह्यातील व्यापाऱ्याने तीन शेतकऱ्यांना पाच लाख ५० हजार रुपये परत दिले आहेत, तर उर्वरित फसवणूक प्रकरणातील १३ व्यापाऱ्यांनी दहा दिवसांत शेतकऱ्याचे पैसे देण्याचे लेखी आश्‍वासन दिले आहे.

 

 

 

दिघावकर यांच्या शेतकरी बांधवांना मदत करण्याच्या भूमिकेमुळे ‍या हंगामात शेतकऱ्यांची काहीअंशी का होईना फसवणूक थांबणार असून, बळीराजा आपला एका जबाबदार अधिकारी जिल्ह्याचे भूमिपुत्र यांच्या विधानाला बळकटी मिळवून पुन्हा जोमाने आपल्या द्राक्ष शेतीवरक पूर्णपणे लक्ष केंद्रित करणार आहे. अशाच प्रकारचे काम भविष्यात साहेबांकडून मिळेल, अशी सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने सदिच्छा व्यक्त केली व महाराष्ट्र पोलिस खात्याचा दणका खऱ्या अर्थाने काय आज अनुभव असल्याने प्रमुख्याने खडक सुकेणे गावातील शेतकरी या घटनेमुळे आनंदित झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here