ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – डोंगरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी गुन्हे तपासात तत्परता दाखवून २४ तासाच्या आत जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना २४ तासांच्या आत अटक केली आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, नन्दलाल हरिनाम सिंग (वय 40 वर्ष , व्यवसाय – चालक रा. ठि. साई पॅलेस अपार्टमेंट, पहिला माळा, रू. नं. 101, प्रगती नगर ,नालासोपारा ,जिल्हा- पालघर) हे गणेश टेम्पो सर्विस ट्रान्सपोर्ट सर्विस मध्ये चालक म्हणून नोकरीस आहेत. व त्यांचे ऑफिस दहिसर पूर्व जिल्हा ठाणे या ठिकाणी असून सदर कंपनीचा आईसर क्रमांक एम एच 47 एस 1148 यावर चालक म्हणून काम करतात.
दिनांक 08/10/ 2020 रोजी यातील फिर्यादी व त्यांच्यासोबत असणारे चार कामगार हे रोड बांधणी करता लागणारे साहित्य घेऊन दहिसर येथून फोर्ट मुंबई येथे आले होते. त्यानंतर त्यांचे काम आटोपल्यानंतर ते फोर्ट येथून दहिसर येथे जात असताना सुमारे 21.00-वाजण्याच्या सुमारास काकळीज चौक सिग्नल जवळ, पी डिमेलो रोड उत्तर्वाहिनी , डोंगरी या ठिकाणी हमरस्त्यावर दोन इसमांनी चाकूचा धाक दाखवत फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांचे वीस हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल व 660 रुपये रोख रक्कम जबरीने चोरी केले बाबत पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिल्याने गु.र. क्र.148/20 कलम 392,34 भादवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्ह्याची तक्रार नोंद करत असताना रात्रपाळी पर्यवेक्षण अधिकारी सपोनि दीपक जाधव गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दिनकर पोलीस उपनिरीक्षक संतोष जाधव पोलीस शिपाई अजित कदम, पोलीस नाईक खामकर, पोलीस शिपाई राजू पवार , पोलीस शिपाई विश्वास शेलार, पोलीस शिपाई किरण कुमावत यांना फिर्यादी यांनी दिलेल्या वर्णनाप्रमाणे पाहिजे आरोपीचा चांभार गोदी व वाडीबंदर परिसरातून अतिशय कौशल्यपूर्ण पद्धतीने माहिती मिळून त्यांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेण्यात आलेले आरोपी जोहर अली अती कार मंडल उर्फ अब्दुल्ला (वय – 22 वर्ष , व्यवसाय – हमाली रा.ठि- मुसाफिरखाना समोरील झोपडपट्टी , झोपडा नंबर 4 , s.v.p. रोड , वाडी बंदर, डोंगरी , मुंबई 9) दाखल अभिलेख गु.र.क्र.20/19 कलम 379,34 भादवि-येलो गेट पोलीस ठाणे, वि.स्था.गु.र.क्र.90/18 कलम 37(1)(a) म पो का-डोंगरी पोलीस ठाणे, गु.र.क्र.1975/18 कलम 679,34 भादवि-वडाळा रेल्वे तर दुसरा आरोपी अब्दुल मोतीहार रहेमान शेख उर्फ गणी (वय – 30 वर्ष , व्यवसाय – नाही रा.ठि. ईस्टर्न फ्रीवे खालील झोपडपट्टी, पी डिमेलो रोड, चांभार गोदी , डोंगरी, मुंबई) यावर दाखल गुन्हे अभिलेख गु.र.क्र. 298/19 कलम 379,34 भादवि-डोंगरी पोलीस ठाणे मुंबई, गु.र.क्र.192/18 कलम 392 भा द वि-डोंगरी पोलीस ठाणे, गु.र.क्र.99/18 कलम 454,511,506, भादवि-डोंगरी पोलीस ठाणे, गु.र.क्र.05/14 कलम 3(a),RP(ip)A 1 आरपीएफ वाडी बंदर, वि.स्था.गु.र.क्र.28/19 कलम 3(a)(1) मपोका-वडाळा पोलीस ठाणे, वि.स्था.गु.र.क्र.08/17 कलम 142 मपोका यांना अटक केली आहे.
त्यांच्याकडून गुन्ह्यातील जबरीने चोरी केलेली वीस हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल व रोख रक्कम असा शंभर टक्के चोरी झालेली मालमत्ता हस्तगत करण्यात आली. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेले हत्यार हस्तगत करण्यात आले आहे.







