पंढरपूर (प्रतिनिधी) – शासनाच्या वतीने राष्ट्रीय एजन्सी मार्फत सन २०२० मध्ये घेतलेल्या NEET ( UG) परिक्षेत सोलापूर येथील मुस्लीम खाटीक समाजाचे कार्यकर्ते इश्तियाकअहमद इब्राहीम शहाजी यांचे कनिष्ट चिरंजीव अब्दुलमुंतकीम यांनी ७२० पैकी ५३५ गुण मिळवित मोठे यश संपादन केले आहे .
या उतुंग यशाने अब्दुल मुन्तकीम यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात MBBS ला प्रवेश मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे . कुठल्याही प्रकारची शिकवणी अथवा कोचींग क्लासला न जाता त्यांनी ही यशाची पताका फडकावली आहे .
अब्दुल मुंतकीम यांच्या या उत्तुंग यशाबद्दल मुस्लीम खाटीक समाजाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक आटपाडी यांचे हस्ते आणि पंढरपूर शहर मुस्लीम खाटीक समाजाचे अध्यक्ष जब्बार उस्ताद यांच्या सन्मानीय उपस्थितीत शाल पुष्पहार घालून सन्मान करणेत आला . पंढरपूरचे शिवसेना नेते आणि मुस्लीम खाटीक समाजाचे राज्याचे नेते इंजिनीयर शकीलअहमद कमलीवाले यांच्या पंढरपुर येथील घरच्या सोहळ्यात हा सत्कार करणेत आला .
यावेळी माजी प्राचार्य आयुब शहाजी, प्रा. परवेज शहाजी विजापूर ,अखिल भारतीय छावा संघटनेचे शहराध्यक्ष सागर चव्हाण, स्वराज्य क्राईम पंढरपूरचे पत्रकार नवनाथ शिंदे,उद्योजक नवनाथ करकमकर, इस्माईल नाडेवाले , फारुकभाई बेदरेकर, मुजावर सर, इनामदार सर , आयूब भडाळे , मुस्ताक कांबळे, अब्दुलरजाक नाडेवाले,मस्तान अलमेलकर सोलापूर , शकील खाटीक कोल्हापूर , रफीक खाटीक, समीर पटेल मिरज अबुबक्कर उस्ताद , अकबर महिबूब शेख , खलील कमलीवाले , जलील कमलीवाले, अकील कमलीवाले, शकील भडाळे, अफजल भडाळे, जब्बार नाडेवाले , रफिक करमाळकर , सादिक बेदरेकर, पंढरपूर , अर्शद खाटीक आटपाडी , फिनिक्स इंग्लीश स्कुल पंढरपूरचे संस्थापक श्री. माळवे सर ,डॉ. समी कुरेशी, डॉ.पाचकवडे, मुस्तफा , मुजम्मील, तवक्कल ,अझहर कमलीवाले, इस्ताक नाडेवाले , सादिक , गौस धारुरकर , जावेद इनामदार, रिजवान , इजिनीयर इम्रान बेदरेकर, काँग्रेस आय च्या पंढरपूर शहर महिला अध्यक्षा आशाताई बागल, प्रोफेसर सौ.लोंढे , तलाठी तांबोळी मॅडम इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते .







