माण तालुक्यातील रांजणी येथे कोट्यवधींच्या विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन

माण

मतदारसंघाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

माण (तालुका क्राइम रिपोर्टर  निलेश अडसूळ) | तालुक्यातील रांजणी येथील श्री शिंगोबा मंदिर परिसरात करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण तसेच गावातील अन्य विविध विकासकामांचे भूमिपूजन काल राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात संपन्न झाले. या सोहळ्याला परिसरातील ग्रामस्थ, महिला आणि विविध क्षेत्रांतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

रांजणी येथील ग्रामस्थांच्या प्रदीर्घ मागणीची दखल घेत मंत्री जयकुमार गोरे यांनी गावात कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून श्री शिंगोबा मंदिर परिसर सुशोभीकरण करणे, ढवळेवस्ती येथे १०० के.व्हि. क्षमतेचा अतिरिक्त रोहित्र (डीपी) उभारणे, पाटील वस्ती येथे सौर ऊर्जा स्ट्रीटलाईट बसवणे, नाईक समाज वस्तीवरील ग्रामपंचायत मालकीच्या जागेत भव्य सभामंडप बांधणे, तसेच अंगणवाडी इमारतीची दुरुस्ती करणे यांसारखी अनेक महत्त्वाची विकासकामे मार्गी लागली आहेत. यातील पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण आणि नवीन कामांचे भूमिपूजन काल करण्यात आले.

यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना मंत्री जयकुमार गोरे म्हणाले,”माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील पायाभूत सुविधांना अधिक बळकटी देण्याचा आमचा संकल्प आहे. अनेक गावांमधील रस्ते, पाणीपुरवठा, सार्वजनिक सुविधा तसेच विविध विकासकामांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल होत आहे. कालचा सोहळा केवळ भूमिपूजनाचा आणि लोकार्पणाचा नसून, आपल्या मतदारसंघाच्या सर्वांगीण प्रगतीचा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. विकासाच्या या वाटचालीत अनेक प्रलंबित कामांना गती मिळत असून, मतदारसंघ झपाट्याने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे.”माण

या सोहळ्याला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारणी सदस्या सौ. सोनिया जयकुमार गोरे (वहिनीसाहेब), सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व माण पंचायत समितीचे विद्यमान सदस्य अर्जुनतात्या काळे, माजी जिल्हा परिषद सदस्य व श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे (आबा), डॉ. संदीप पोळ, नानासाहेब दोलताडे, डॉ. बाबासाहेब दोलताडे, दादासाहेब काळे आणि सातारा जिल्हा भाजपा कायदा आघाडीचे अध्यक्ष ॲड. दत्तात्रय हांगे उपस्थित होते.

तसेच भाजपचे म्हसवड मंडल अध्यक्ष प्रशांत गोरड, प्रकाश कापसे, डॉ. प्रमोद गावडे, म्हसवड शहराच्या विद्यमान नगराध्यक्षा सौ. पूजा सचिन विरकर, काकासाहेब माने, अमोल माने यांच्यासह रांजणी गावातील ग्रामस्थ, माता-भगिनी आणि माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माणमाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here