जळगाव जिल्ह्यात ४६ हजार २२९ रुग्णांची कोरोनावर यशस्वी मात

corona-negative

शुक्रवारी आढळले १२१ कोरोनाबाधित; ४५४ रुग्णांनी केली कोरोनावर मात

 

 

जळगाव (प्रतिनिधी) – शुक्रवारी (दि.९) कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅब तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यात १२१ कोरोनाबाधित आढळून आलेत. जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस कमी होत असल्याने, नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

 

आज आढळलेल्या १२१ कोरोनाबाधितांमध्ये सर्वाधिक २८ कोरोनाबाधित भुसावळ तालुक्यात आढळले आहेत. तर जळगाव शहर -११, जळगाव ग्रामीण-०, अमळनेर-११, चोपडा-१६, पाचोरा-०, भडगाव-०, धरणगाव-३, यावल-६, एरंडोल-२, जामनेर-११, रावेर-६, पारोळा-१, चाळीसगाव-२२, मुक्ताईनगर-२, बोदवड-१ आणि अन्य जिल्हा १ असा समावेश आहे.

 

 

आज १२१ कोरोनाबाधित आढळल्यानंतर जिल्ह्यातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या ५० हजार ७८६ झाली असून त्यापैकी ४६ हजार २२९ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज १ रूग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात कोरोनामुळे मृत पावणाऱ्यांची एकूण संख्या १ हजार २१९ झाली आहे. सद्यस्थितीत ३ हजार ३३८ कोरोनाबाधित विविध कोवीड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here