खुलताबादेत“माझे कुटुंब, माझी जबाबदारी” मोहिमे अंतर्गत शिवसेनेच्या वतीने विविध ठिकाणी साबण वाटप

kultabad-shivsena

खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव संपुष्टात आणण्यासाठी आपल्या सर्वांना सवयीत बदल करुन नवीन जीवनशैली आत्मसात करणे आवश्यक आहे. त्याबाबत मार्गदर्शन करणारी “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” मोहिम कोरोनाला हद्दपार करण्यास उपयुक्त ठरणारी आहे.

 

सर्वांनी मोहिमेत सक्रिय सहभागी होत ही लोकचळवळ बनवावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले असुन खुलताबाद येथे विविध ठिकाणी फळ व भाजी विक्रेतांना शिवसेनाच्या वतीने साबणाचे वाटप करण्यात आले.यावेळी तालुकाध्यक्ष राजू वरकड ,विष्णु पा.फुलारे ,नगरसेवक नंदू साळुंके,विकिन हजारे ,व शिवसेनेचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते. कोरोनाविरुद्धच्या लढाईत स्वसंरक्षण आणि खबरदारीसह जगणे या साठी सोशल डिस्टन्सिंग आणि वारंवार हाथ धुवने हे प्रतिबंधात्मक उपाय आहे.

 

 

नागरिकांना स्वसंरक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” मोहिम सर्वाथाने उपयुक्त ठरणार आहे, असे सांगून वरकड म्हणाले, राज्यात आज 15 सप्टेंबर पासून “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” ही मोहिम राबविण्यात येत आहे. निरोगी जीवनशैलीसाठी सवयींमध्ये बदल करून आपल्या सर्वांना अधिक खबरदारीसह जगावे लागणार आहे, तरच आपण संसर्गाला रोखण्यात शंभर टक्के यशस्वी होऊ. या मोहिमेतून प्रत्येक नागरिकांचे सर्वेक्षण, आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. त्यासोबतच कोरोना विरुद्ध लढतांना घ्यायची काळजी याबाबत मार्गदर्शन करुन जनजागृती करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here