दहावीत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणारा जेरबंद

बलात्कार
file photo

बीड (प्रतिनिधी) । जिल्ह्यातील केज तालुक्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. दहावीत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपी समीर ताजोद्दीन शेख (वय २०, रा. सुर्डी-सोनेसांगावी) अटक केली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, समीर ताजोद्दीन शेख या तरुणाने शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास मुलीला फूस लावून नेले. संबंधित आरोपी हा पिकअप वाहन चालक म्हणून काम करतो. मुलगी घरी परतली नसल्याने तिच्या वडिलांनी युसूफवडगाव पोलिसांकडे धाव घेतली. तक्रार मिळताच पोलिसांनी विविध तांत्रिक साधनांचा वापर करून तपासाची दिशा ठरवली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here