नवी मुंबई पोलिसांनी ३६ लाखाच्या गुटखा व पानमसालासह ५० लाखाचा मुद्देमाल केला जप्त

navi-mumbai-police-4

नवी मुंबई (प्रतिनिधी  विरेंद्र म्हात्रे) –  नवी मुंबई पोलिसांनी दमदार कामगिरी करत ३६ लाख रुपयांच्या गुटखा पान मसाला व गाड्यासह सुमारे ५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सविस्तर माहिती प्रमाणे दि. ९-१०-२०२० रोजी रबाळे MIDC परिसरातील हॉटेल सिल्वर की याठिकाणी ४ आरोपीना अटक करण्यात आली.

 

 

 

या कार्यवाही दरम्यान  ३५, ५३, ३१२ रुपये किंमतीचा पान मसाला व गुटखा, ८ लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो, ४ लाख रुपये किमतीची १ बोलेरो पिकअप, २ लाख रुपये किमतीची इको व्हॅन. जप्त करण्यात आली असून जितेंद्र दास. वय २६, आखाया खंडा. वय २२, प्रियव्रत दास. वय २९, मुन्ना यादव. वय २८ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्यावर २२४/ २०२०. भादवी १८८,२७२,२७३,३२८,३४ सह अन्न सुरक्षा व मानदे (प्रोहीबीशन अँड रिस्ट्रिक्षण ऑन सेल २०११ नुसार) शिक्षा सुनावली असून मा. न्यायालयाने आरोपीना १२-१०-२०२० पर्यंत रिमांड मंजूर करण्यात आला आहे.

 

 

उपरोक्त कार्यवाही पोलीस आयुक्त बीपीनकुमार सिह, पोलीस सह आयुक्त जय जाधव, अपर पोलीस आयुक्त डॉ. बी. जी. शेखर पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली व वपोनी. रवींद्र बुधवन्त, अमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, वपोनी, एन बी कोल्हटकर, सपोनि विनया परासुर, राजेश गज्वल, पोलीस अंमलदार सचिन भालेराव, कासम पिरजादे, इक्बाल शेख, बाबा संगोलकर, योगेश नाईक, संजय चौधरी, उमेश उटगीकर, आतिष कदम, विष्णू पवार,  राहुल वाघ, बाबू सरफरे, मेघनाथ पाटील, राजेश मोरे, व सचिन टिके यांनी सदर कामगिरी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here