अमळनेर येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या धाडीत पाच लाखांचा गुटखा जप्त

jalgaon-police

जळगाव (प्रतिनिधी निलेश पाटील) – जिल्ह्यातील अमळनेर येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत पाच लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.

 

 

 

अमळनेर पोलिस स्टेशन हद्दीतील शनिपेठ मंगळनगर येथील गोकुळ जगन्नाथ पाटील यांच्या घरात पोलीस निरीक्षक बापूसाहेब रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला.

 

 

 

या छाप्यात ५ लाख १५ हजार १२० रुपयांचा गुटखा आढळून आला. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात भा.दं.वि. २७२, २७३, ३२८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here