अनेक वर्षांपासून केली नव्हती साफसफाई
खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – तालुक्यातील वेरूळ येथील शहाजीराजे भोसले स्मारकांची गेल्या अनेक वर्षांपासून स्वच्छता व साफसफाई झाली नव्हती त्यामुळे स्मारक चोहोबाजूंनी गाजर गवतांनी व झाडाझुडूपांनी वेढले गेले होते. या प्रसंगी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने पुढाकार घेऊन दोन जेसीबी,एक ट्रेक्टर व वीस पदअधिकाऱ्यांनी स्मारक परिसराची साफसफाई केली आहे. 
माजी खा.समीर भुजबळ यांच्या वाढदिवसाचे निमित्त स्वच्छता मोहीम अभियान राबविण्यात आली.वेरूळ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या मालकीच्या गढीवर शहाजीराजे भोसले यांच्या भव्य स्मारकाचे काम सुरू असून कोट्यावधी रूपयांची विकास कामे झाले असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे विकास कामासांठी 49 लाख रूपये पडून असून गेल्या अकरा वर्षांपासून स्मारकाचे काम बंद असल्याने शहाजीराजे भोसले स्मारक चोहोबाजूंनी गाजरगवतानी वेढले गेले आहे. पंरतू स्वच्छता व साफसफाई होत नसल्याने पर्यटक व भाविकांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. पंरतु अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष मनोज घोडके , महानगरअध्यक्ष गजानन सोनवणे , जिल्हासमन्वयक निशांंत पवार , कार्याध्यक्ष गणेश काळे, प्रसिध्दीप्रमुख संदीप घोडके, शहराध्यक्ष चंद्रकांत पेहरकर, शहरसचिव वामन भागवत, आर.बी.सोनवणे, नागेश हिवाळे , संजय माळी , विराज घोडके , गणेश निकम राहुल निकम, रामभाऊ पेहरकर,नागेश मगर,शंकर वाणी यांनी स्वत: साफसफाई केली तसेच दोन जेसीबी मशीन व ट्रैक्टरच्या साह्याने स्मारक परिसर चकाचक केला.
यावेळी जिल्हाध्यक्ष मनोज घोडके म्हणाले की, शासनाच्या दुर्लक्षामुळे शहाजीराजे भोसले स्मारकाचेे काम गेल्या अकरा वर्षापासून रखडले आहे. स्मारकाच्या झालेल्या कामाची तुटफूट झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग जाणून बुजून स्मारकाचे विकास कामे सुरू करीत नाही.स्मारकाकडे दुर्लक्ष करणा-या अधिकारी कर्मचारी यांची चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी शेवटी मनोज घोडके यांनी केली आहे.







