खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खुलताबाद येथील सुप्रसिद्ध सुफी संत हज़रत ख़्वाजा शेख मुन्तजिबोद्दिन ज़रज़री ज़रबक्ष दूल्हा मिया (रह) यांचा उरुस भरणार नाही तसेच ईद मिलाद-उ-नबी चा कार्यक्रम होणार नसल्याचा निर्णय खुलताबाद पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक सीताराम मेहेत्रे यांनी घेतलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.कोरोनाच्या प्रादुर्भाव बघता भाविकांनी खुलताबाद येथे येऊ नये असे आवाहन उरुस व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी खुलताबाद येथील दर्गा ज़रज़री ज़रबक्ष यांच्या उरुस दिनांक 24 ऑक्टोबर रोजी संदल तर 25 उरुसाचे प्रारंभ होत आहे.हा उरुस महाराष्ट्रातील सर्वात मोठा उरुस म्हणून ओळखला जातो.या उरुसासाठी अवघ्या देश भरातुन भाविक लाखोंच्या संख्येने येतात.महीना ते दीड महिना चालनार्या उरुसात लोक खाजा ,पाळने,हॉटेल,फूल विक्रेते,ज्वेलर्स,अश्या शेकडो दुकाने लावतात.या उरुसात लाखोंची उलाढाल होते.मात्र यंदा कोरोनामुळे हे सर्व उपक्रम रद्द झाले आहेत.
येत्या 22 ऑक्टोबरपासून हज़रत ख़्वाजा शेख मुन्तजिबोद्दिन ज़रज़री ज़रबक्ष दूल्हा (रह) यांच्या 734 व्या उरुसाला सुरुवात होणार होती.हज़रत ख़्वाजा शेख मुन्तजिबोद्दिन ज़रज़री ज़रबक्ष (रह) यांची दर्गा एक जाज्वल्य देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे.
उरुसामिमित्त खुलताबाद तालुक्यासह औरंगाबाद जिल्ह्यातील व राज्यातील विविध जिल्ह्यंतुनविविध जातिधर्माचे ,वंशाचे,विविध संस्कृतींचे हजारो भाविकभक्त दर्शनासाठी येथे येतात.परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून हा दर्गा बंद ठेवण्यात आली आहे.
संपूर्ण देशात कोरोनाने धुमाकूळ घातले असुन कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक पसरु नये यासाठी खुलताबाद पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक सीताराम मेहेत्रे यांनी पोलिस ठाण्यात उरुस व्यवस्थापन समितीची व दर्गा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली होती.या बैठकीत उरुस व जशने ईद मिलाद-उ-नबी कार्यक्रमाविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.विशेष म्हणजे या कार्यक्रमात राज्य नव्हे तर देशभरातुन लाखोच्या संख्येत भाविक दर्शनासाठी येतात.परंतु यंदा कोरोनाच्या वाढता प्रकोपामुळे शासनाने घातलेल्या अटी व नियम त्या मध्ये सगळेच धार्मिक स्थळे बंदच आहेत.त्याचे पालन दर्गा कमिटी करणार असल्याचे दर्गा कमिटीचे अध्यक्ष फजीलत अहमद यांनी सांगितले.

या बैठकीत पोलिस निरीक्षक सीताराम मेहेत्रे ,हज़रत ख़्वाजा शेख मुन्तजिबोद्दिन ज़रज़री ज़रबक्ष (रह) दर्गा उरुस व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा नायब तहसीलदार गवळी,उपाध्यक्ष तथा दर्गा कमिटीचे अध्यक्ष फजीलत अहमद,सचिव तथा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी ज्योती भगत पाटिल,दर्गा कमिटीचे सदस्य तथा माजी नगराध्यक्ष अॅड.क़ैसरोद्दीन,दर्गा कमिटीचे माजी अध्यक्ष तथा नगरसेवक मुनीबोद्दीन,दर्गा कमिटीचे माजी सचिव शेख हुस्नोद्दीन,बावीस ख़्वाजा दर्गा कमिटीचे अध्यक्ष शरफ़ोद्दीन मो. रमज़ानी, दर्गा हद्दे सुवमचे माजी अध्यक्ष नवाब क़मरोद्दीन उपस्थित होते.







