शहरातील ऑनलाईन पद्धतीने सुरु असलेले कल्याण-मुंबई मटका व लॉटरी चे अवैध धंदे बंद करण्याची मागणी

kultabad-police

खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – शहरातील जुने बस स्थानक,आठवडी बाजार,गुलमंडी परिसरात तसेच पाण्याची टाकी आदि भागात ऑनलाईन पद्धतिने सुरु असलेला लॉटरी व्यवसाय तातडीने बंद करा अशी मागणी नगरसेविका शेख सयदा बेगम जाफर यांनी खुलताबाद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सीताराम मेहेत्रे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

 

 

नगरसेविका सयदा बेगम यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,शहरातील मुख्य ठिकाण जुने बस स्थानक परिसर,तसेच गुलमंडी,आठवडी बाजार ,पाण्याची टाकि आदि भागात काही दुकानात खुलेआम ऑनलाईन लॉटरीची दुकाने सुरु आहे.

 

 

 

शहर नजीक सूलीभंजन परिसरात कल्याण-मुंबई मटका सुरु आहे.हे सर्व गोरख व अवैध धंदे सुरु असुन अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत.खुलताबाद परिसरातील हे सर्व धंदे तातडीने बंद झाले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नगरसेविका सयदा बेगम यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here