कांद्याला किमान २० रू किलो दराने शासनाने खरेदी करून उत्पादकांना न्याय द्यावा; राज्य कांदा उत्पादक संघटनेची कृषी मंत्री दादा भुसे कडे मागणी

नाशिक (कुबेर जाधव) – दिवसे दिवस कांद्याचे भाव घसरत असुन ,कांदा उत्पादकांच्या रास्त मागणी साठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेच्या पदाधिकांऱ्यांनी दि.२९ जुनं रोजी मालेगांव येथील राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्या संपर्क कार्यालयात तीन तास ठिय्या मांडुन केंद्र व राज्य सरकार या दोघांनी मिळून, चाळीत साठवुन ठेवलेला उन्हाळी कांदा किमान २० रू / किलोने खरेदी करून कांदा उत्पादकांच्या डोळ्यातील अश्रू पुसावेत असी मागणी केली.
महाराष्ट राज्य कांदा उत्तपादक संघटनेचे संपर्क प्रमुख कुबेर जाधव यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकांऱ्यानी मालेगांव येथील संपर्क कार्यालयात ना.दादा भुसे यांच्या कार्यालयीन संपर्क प्रमुख प्रमोद शुक्ला यांना निवेदन देण्यात आले ,यावेळी कृषी मंत्री दादा भुसे हे बाहेरगांवी कार्यक्रमात व्यस्त असल्याने त्यांच्याशी फोनद्धारे संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की मी कांदा उत्पादकांच्या रास्त मागण्यांचा सकारात्मक विचार करून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन देतो.
यावेळी कांदा उत्पादक संघटनेचे संपर्क प्रमुख कुबेर जाधव ,प्रदेश संघटक कृष्णा जाधव ,जिल्हा सरचिटनिस दुष्यंत पवार , संघटक व व्यंगचित्रकार किरण मोरे ,प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष दशरथ पुरकर, कार्यालयीन कर्मचारी थोरात आदी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here