जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हा प्रशासनाकडून आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात २३८ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून १२८ रूग्णांना कोरोनाची बाधित झाली आहे. तर दोन रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर – ३४, जळगाव ग्रामीण- १, भुसावळ-१८, अमळनेर-२२, चोपडा-१, पाचोरा-६, भडगाव-३, धरणगाव-३, यावल-९, एरंडोल-०, जामनेर-६, रावेर-२, पारोळा-२, चाळीसगाव-२१, मुक्ताईनगर-२, बोदवड-६, इतर जिल्हा-२ असे एकुण १२८ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे.
जिल्ह्यात एकुण ५१ हजार ६९७ रूग्ण आढळून आले असून ४८ हजार ३५५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज २ रूग्णांचा मृत्यू झाला. एकुण जिल्ह्यात १२३७ रूग्णांची मृत्यूचा आकडा पोहचला आहे. तर जिल्ह्यात आता २ हजार २०५ रूग्ण कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहे.







