तळोदा येथे पिस्तुलसह एकास अटक

pistol

नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – तळोदा शहरातील चौफुलीवर पिस्तुल विक्रीच्या उद्देशाने फिरणार्‍या एकाला पोलीसांनी अटक केली असुन त्याच्या जवळुन पिस्तुलसह जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहेत.

 

 

 

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.15 ऑब्टोंबर रोजी रात्री 9.15 वाजेदरम्यान धर्मा चौधरी हा गावठी बनावटीचे पिस्तुल व दोन काडतुस अवैध पणे कब्जात बाळगुन तळोदा शहरातील चिनोदा चौफुलीवर विक्री करण्याच्या उद्देशाने मिळुन आला.

 

 

 

पोलीसांनी त्याच्या जवळुन 25 हजाराचे गावठी बनावटीच पिस्तुल व 1 हजाराचे दोन जिवंत काडतुस जप्त करण्यात आले.पोहेकॉ दिपक गोरे यांच्या फिर्यादीवरून तळोदा पोलीस ठाण्यात धर्मा धना चौधरी रा.मंदाणा, ता.शहादा याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी त्याला अटक करण्यात केली आहे.याप्रकरणी पुढील तपास सपोनि अविनाश केदार करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here