पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांच्या प्रयत्नांना यश
नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – पोलिसांचे काम अशा पद्धतीचे आहे की सोशल डिस्टन्सिंग पाळणे केवळ अशक्यच. त्यामुळे पोलिसांना कोरोनाची लागण होण्याचे व त्यामुळे मृत्यू पावण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले.
मागणी केल्यानंतर २९ मे २०२० रोजी तब्बल २ महिन्यांनंतर पोलिसांना कोरोना योद्धा असल्याचे मान्य करून कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबियांना ५० लक्ष रुपयांचे सानुग्रह साहाय्य देण्याचे शासनाने जाहीर केले. मात्र त्यासाठी मयत पोलिसांना मृत्यूपूर्वी किंवा उपचारासाठी दवाखान्यात दाखल होण्यापूर्वी १४ दिवसांच्या कालावधीत कोविड-१९ प्रतिबंधकामी तैनात करण्यात आल्याच्या प्रमाणपत्राची मागणी करण्यात आली होती.
पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांमुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या शहादा येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक फुलपगारे यांना ५० लाख रुपयांच्या सानुग्रह अनुदानाचा धनादेश देण्यात आला.







