पुणे (प्रतिनिधी आकिल शेख) – वानवडी पोलिस स्टेशन हद्दीमध्ये दि. १२/१०/२०२० रोजी इसम नामे मयुर विजय हांडे वय २९ वर्षे धंदा बिल्डींग मटेरीयल सप्लायर्स, रा. सिद्धीविनायक समृद्धी सोसायटी स.नं. १९/१५, हांडेवाडी, होळकरवाडी रोड ता. हवेली. जि. पुणे याचे वर अनोळखी इसमाने स्व:ताजवळील पिस्टलने फिर्यादी यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केला व फिर्यादीच्या डाव्या गालावर बुलेट लागुन फिर्यादी जखमी झाल्याने वानवडी पोलीस स्टेशन, गु.र.नं. ८५०/२०२० भादवी कलम ३०७,भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५),महाराष्ट्र पोलिस अधिनीयम ३७(१)(३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजची तपासणी व बातमीदारांकडुन मिळालेल्या माहीती वरुन वानवडी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने फायरींग करणाऱ्या आरोपीस सापळा रचुन बिबवेवाडी परीसरात शंकरमठाजवळ ताब्यात घेतले त्याचे नाव व पत्ता राजेश भिक पडवळ वय २५ वर्षे रा. संभाजी नानगडे यांच्या घरी भाड्याने, गोरे (बुद्रुक) ता हवेलि जि. पुणे असल्याचे निष्पन्न झाले आहे.
गुन्हे शाखा, पुणे शहर व युनिट ५ यांनी देखील समांतर तपास करुन यातील मुख्य सुत्रधार आरोपी नामे बाळासाहेब अनंत जाधव वय ५२ वर्षे रा.काळुबाई निवास, पिरसाहेब मंदिरा शेजारी, जाधव नगर,मु.हांडेवाडी गाव,पोस्ट उरुळी देवाची ता हवेलि जि. पुणे यास ताब्यात घेतले आहे.सदर गुन्ह्यातील संशयित आरोपीनां ४८ तासात जेरबंद केल्याबद्दल मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी वानवडी पोलीस स्टेशन, गुन्हे शाखा व युनिट ५ मधीस अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले.







