पुणे कॅम्प येथील घटना; लष्कर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
पुणे (प्रतिनिधी आकिल शेख) – शुक्रवारी सायंकाळी बाबाजान चौकात कबाब पावच्या गाडीजवळ किरकोळ कारणावरुन झालेल्या वादाचे पर्यावसान खूनात झाले. याबाबत लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, आरोपीसदेखील ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, दिनांक- १६/१०/२०२० रोजी सायं १६/३० वा. चे सुमारास बाबाजान चौक, कॅम्प पुणे येथे कबाब पाव ची गाडी लावणारा मयत नामे ओबेद गुजफर कुरेशी वय ३० वर्षे रा. गल्ली नं. २३, घर क्र.- १७५४ भिमपूरा कॅम्प पुणे याचा आरोपी नामे नबील शब्बीर बेलीम रा. घर नं.१७३५, भिमपुरा कॅम्प पुणे याने मयत ओबेद कुराशी याने आरोपी नबील यारा आईवरुन शिवी दिल्याने त्याचा राग मनात ठेवुन ओबेद कुरेशी याचे छातीवर चाकुने भोकसुन खुन केला असल्याबाबत ओबेद कुरेशी याचा मावस भाऊ नामे मोहंमद शोएब शरीफ कुरेशी वय २२ वर्षे, धंदा. कार पेटींग रा. गल्ली नं.- २३, घर क्र.- १७५४ भिमपूरा कॅम्प पुणे यांनी तक्रार दिल्याने लष्कर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नंबर २९८/२०२० भादवि कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर घटनास्थळाचे ठिकाणी मा.पोलीस उप आयुक्त श्री सागर पाटील सो, परिमंडळ २ पुणे शहर व मा.सहा.पोलीस आयक्त चंद्रकांत सांगळे सो, लष्कर विभाग पुणे यांचे मार्गदर्शना खाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री चंद्रकांत भोसले सो, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री अरुण हजारे यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे तपास पथकातील अधिकारी कर्मचारी असे पेट्रोलिंग करत असताना पो.शिं. १२००५ शिंरगिरे, पोशि ७३३० राऊत यांना बातमिदारामार्फत दाखल गुन्हयातील आरोपी हा जनरल बेऊर रोड, कॅम्प पुणे येथे थांबला असल्याचे कळाल्याने लागलीच पोउपनि डोंगळे, पोहवा ५६७९ कदम, पोना नदाफ, पो.शिं. १२००५ शिंरगिरे, पोशि ७३३० राऊत, पोशि ९८१५ भोसले, पोशि ८९२९ शिंगे असे मिळुन तात्काळ सदर ठिकाणी जावुन आरोपीस ताब्यात घेवुन त्यास दाखल गुन्हयाबाबत विचारपुस करता त्यांने दाखल गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्यास अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री अरुण हजारे हे करीत आहेत.
सदरची कामगीरी ही मा.पोलीस उप आयुक्त श्री सागर पाटील साो, परि.२ पुणे व मा. सहा. पोलीस आयक्त चंद्रकांत सांगळे सो, लष्कर विभाग पुणे यांचे मार्गदर्शना खाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री चंद्रकांत भोसले सो, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री अरुण हजारे यांचे नेतृत्वाखाली तपास पथकाचे पोलीस उप निरिक्षक श्री प्रल्हाद डोंगळे, तपास पथकातील पोहवा ५६७९ कदम, पोना ७५७१ नदाफ, पो.शिं. १२००५ शिंरगिरे, पोशि ७३३० राऊत, पोशि ९८१५ भोसले, पोशि ८९२९ शिंगे यांनी केलेली आहे.







