धरणगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – येथील प्रभाग क्रमांक 10 मधील पारधी वाडा परिसरात नुकत्याच पेव्हर ब्लॉगच्या शुभारंभ शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबरावजी वाघ यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच चेतन जाधव यांचा वाढदिवससुद्धा शिवसेनेतर्फे साजरा करण्यात आला.
या प्रसंगी उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील सर,नगराध्यक्ष निलेश चौधरी,चर्मकार समाजाचे नेते भानुदास आप्पा विसावे, नगरसेवक वासुदेव चौधरी,उपनगराध्यक्ष विलास महाजन,अजय चव्हाण,रवींद्र जाधव किरण मराठे,धीरेंद्र पूर्वे, सुकलाल महाजन,सुनील चव्हाण,सचिन धनगर, महेश चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.







