मुलुंड मधील वृद्धाच्या खुनाचा उलगडा,अंधश्रद्धेपोटी खुनाची सुपारी देणाऱ्या २ भावांसह ६ जण गजाआड

thane-police

मुंबई पोलिसांच्या परिमंडळ ७ च्या विशेष पथकाची उत्तम कारवाई

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – वडिलांचा मृत्यू करणी केल्यामुळे झाला. वडिलांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी ३ जणांचा बळी द्यावा लागेल, या अंधेश्रद्धेतून खुनाची सुपारी देऊ न मुलुंड परिसरात ७० वर्षीय वृद्धाचा खून करण्यात आला. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या परिमंडळ ७ च्या हद्दीतील पोलिसांच्या विशेष पथकाने सुपारी देणाऱ्या २ भावांसह ४ हल्लेखोरांना गजाआड केले. आणखी दोन जणांची हत्या होण्यापूर्वीच आरोपींना तुरुंगात धाडले, अशी माहिती परिमंडळ ७ चे उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली.

 

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, #मुलुंड पश्चिम परिसरात राहणारे ७० वर्षीय शंकर साळवी (बदलेले नाव) नेहमीप्रमाणे २ आॅक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास झोपण्यासाठी मुलुंड पश्चिम परिसरातील वालजी लद्दा मार्गावरील सिल्व्हर ग्लास दुकान येथे गेले. दुसरा दिवस उजाडला तरी शंकर साळवी घरी परत आले नाही. त्यामुळे चिंताग्रस्त झालेला त्यांचा मुलगा सुनील(बदलेले नाव) वडिलांना पाहण्यासाठी दुकानाजवळ आला. शंकर साळवी यांच्यावर वार करून खून करण्यात आल्याचे एका रिक्षा चालकाने सुनील याला सांगितले. त्यानुसार सुनील याने पोलीस ठाणे गाठले. मुलुंड पोलिसांनी या प्रकरणी (गु. र. क्र. ६४५/२०२०) भादंवि कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या तपासासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ ७ च्या हद्दीतील कर्तव्य पोलिसांचे विशेष पथक नेमले. .

 

 

तपासादरम्यान, तपासी पथकाला समजले की, शंकर साळवी हे ज्या समाजाचे आहेत त्या समजातील कन्हैय्या मोरे याचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. वडिलांच्या मृत्यूमुळे समाजातील काही जणांनी दुखवटा पाळला नाही व अंत्यविधीला देखील आले नाहीत. त्यांनीच करणी केल्यामुळे वडिलांचा मृत्यू झाला, असा मुलगा दीपक मोरे(३८) व विनोद मोरे (३०) यांनी केला आहे, अशी माहिती तपासादरम्यान पोलिसांना समजली. त्यानुसार पोलिसांनी या दोन्ही भावांची चौकशी केली असता शंकर साळवी यांच्या खुनाचा उलगडा झाला.

 

 

अंधश्रद्धेतून दोन्ही भावांनी वडिलांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी किमान ३ जणांचा बळी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्यांनी #घाटकोपर, #मानखुर्द, #गोवंडी आदी परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मोहम्मद आसिफ नासिर शेख, मोहम्मद मैनुद्दीन अन्सारी, मोहम्मद आरिफ अब्दुल सत्तार खान आणि शहानवाज ऊर्फ सोनू अखतर शेख यांना खून करण्यासाठी 70 हजार रुपयांची सुपारी दिली.

 

 

शंकर साळवी घराबाहेर झोपत असल्याने त्यांचा पहिला बळी घेण्याचा त्यांनी कट रचला आणि त्यानुसार हल्लेखोर चौघांनी शंकर साळवी यांच्या मानेवर, पोटावर, छातीवर वार करून डोक्यात सिंमेटचा ब्लॉक टाकून पळ काढला. सदर खून करून आरोपींना राजस्थान, अजमेर येथे पलायन केले. सदर माहितीच्या आधारे तपासी पथकातील काही पोलिसांनी राजस्थान गाठले.
मात्र पोलीस आपल्या मागावर असल्याचे समजताच आरोपी पुन्हा मुंबईला पळाले, अशी माहिती राजस्थानमध्ये गेलेल्या तपासी पथकाने दिली. त्यानुसार मुंबईत तपासी पथकातील इतर पोलिसांनी सापळा लावला. मोहम्मद आसिफ नासिर शेख (२८), मोहम्मद मैनुद्दीन अन्सारी ऊ र्फ (२७), मोहम्मद आरिफ अब्दुल सत्तार खान (३०) आणि शहानवाज ऊर्फ सोनू अखतर शेख (३०) हे मुंबईत दाखल होताच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या.

 

 

सदर खुनाचा उलगडा #मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग, सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नागरेपाटील, पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त संजय दराडे, परिमंडळ ७ चे उपायुक्त प्रशांत कदम, मुलुंड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त पांडुरंग शिंदे, प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश ढसाळ, पोलीस निरीक्षक वारके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष कांबळे, विजय सांडभोर (#विक्रोळी पोलीस ठाणे), सहाय्यक पोलीस निरीक्षक राजगुरू (नवघर पोलीस ठाणे), समाधान चव्हाण (घाटकोपर पोलीस ठाणे), पोलीस उपनिरीक्षक मुलानी, पंडित सोनावणे, दिनेश बागुल (#भांडुप पोलीस #ठाणे), तुकाराम भोपळे (#नवघर पोलीस ठाणे), अमित यादव (#पंतनगर पोलीस ठाणे) व विशेष पथकातील पोलीस नाईक चौरे, पोलीस शिपाई शिवदे, पोलीस शिपाई मनोज पाटील, पोलीस शिपाई घाडगे, पोलीस शिपाई हंबर, पोलीस शिपाई वनकळस, पोलीस शिपाई नितीन पाटील, पोलीस शिपाई पवार, पोलीस शिपाई मोहन शिंदे, पोलीस शिपाई बोडके, पोलीस शिपाई कोकाटे, पोलीस शिपाई वाघमारे, पोलीस शिपाई बोकरे आदी पथकाने केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here