युती आणि ए.टी.एम….. एक आठवण

atm

शाम जाधव (पत्रकार)
मला आजही आठवतं माझं इयत्ता 9 वी पर्यंत शिक्षण प्रताप विद्या मंदीर , चोपडा या माझ्या शाळेत झाले . मीच काय माझा अख्खा वर्ग खोडकर आणि टारगट ; म्हणजे आम्ही 8 वी पास केली व पुढच्या वर्गात गेलो , पहिल्या दिवशीच कळले आमच्या साठी नवीन तुकडी काढली होती , 9 वी ‘ ड ‘ आमचे क्लास टीचर टी .एम .चौधरी सर …! वर्गात दोन – तीनच हुशार मुलं अनावधानाने आली .बाकी एकही विद्यार्थिनी नाही …..???? टी एम सरांचा पहिलाच तास असे इंग्रजीचा तो आमच्या साठी बाऊंसर बॉल समान असे , म्हणजे कधी बॉल आला कधी गेला काहीच कळेना . टी एम सर वर्गात आले , हजेरी झाली , मग त्यांनी डस्टर घ्यायचे आणि आम्ही हात पुढे करायचे , हातावर लाल व्रण उमटे पर्यंत त्यांनी धोपटायचे आम्ही रंगून झालेला हात पार्श्वभागावर जोरात चोळून खूप लागलं असा दिखावा करायचा हे वर्षभर चाललं .पण आम्ही काही सुधारलो नाही

 

 

 

इयत्ता 9 वी जेमतेम पास झालो .( काठावर )सुट्ट्या संपल्या आपण 10 वीत जाणार , या आशेने शाळेत गेलो ; पण कळले की माझा दाखला या शाळेतुन काढला गेला .घरी आलो तेंव्हा समजले घरची मंडळी ( आई – वडील कधीच वारले होते ) माझ्या स्वभावाला , वागण्याला , रोज घरी येणाऱ्या भांडणाला कंटाळली होती .माझा मोठा भाऊ त्या काळी मुंबईत हॉटेल ताज या पंचतारीका हॉटेलात काम करीत असे . त्यानेच माझे नाव प्र वि म मधून काढून मुंबईत कल्याण येथील सरस्वती विद्या मंदिर या शाळेत घातले होतें .चोपडा येथून मुंबईत गेलेला ( शिक्षण घेण्यासाठी )विद्यार्थी पास होइल का ? व्हायचे तेच झाले ! पण मी मुंबईत काही वर्ष रमलो रात्रीच्या अंधारात सारं बंद होतंय पण एक चकाचक लाईट , थंडगार ए सी ची हवा असलेली टुमदार दुकान .. पण गर्दी नसलेली रात्रभर सुरूच राहायची .मी कुतूहलाने बाहेर थांबलेल्या गार्डला विचारले . ‘भाई ये क्या है ‘

 

 

 

तो म्हणला ये A .T.M. है …!काही काळाने कळले त्याचा उपयोग .आज प्रत्येक गावात A .T .M . आहे .त्याचा अर्थ बघितला तर ऑटोमॅटिक ट्रांझेकशन मशीन असा होतो असे ब्यांकर सांगतात .पण लोकं मजेशीर अर्थ काढतात .जसे .. एनी टाईम मनी , असाल तीथे मनी .. , असेल तरच मिळेल ???????? सुविधा तशी खूप चांगली आहे .पण त्याचा गैरवापर आणि त्यातून होणारी ऑनलाइन फसवणूक चिंतेची बाब आहे .आपले डेबिट कार्ड , एटीएम कार्ड ,क्रेडिट कार्ड ,असे अन्य कार्डचा तपशील वापरून ह्याकर आपली मेहनतीची कमाई काही सेकंद वापरून अन्य खात्यावर वळवून घेतात .आत्ता कोरोनाच्या काळात तर A T M चा अर्थ म्हणजे ,असाल तिथेच मरा ..( स्टे ऍट होम ) असाही काहींनी काढला ????????महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना माझ्यावर प्रभाव पडला तो शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांचा .त्यांची त्या काळची भाषणं मिळेल त्या ठिकाणी उभं राहून मी टेपरेकॉर्डरवर ऐकत असे .मा. बाळासाहेब म्हणजे खऱ्या अर्थाने हिंदू हृदय सम्राट… ! साहेब असतील .. लतादीदी .. सचिन तेंडुलकर ..महानायक अमिताभ बच्चन ..आणि आज राजसाहेब ठाकरे ही असली माणसं पुन्हा – पुन्हा जन्म घेत नसतात .ही दैवीरूपी माणसं! आपण याची देहा बघितलीत हे आपले भाग्यच म्हणावे ! स्व. बाळासाहेबांची भाषणं म्हणजे त्यावेळी पर्वणीच असायची. मला आजही आठवते . शिवसेना -भा ज पा आणि आर पी आय ( आठवले गट ) यांची युती झाली त्यात प्रमुख भुमिका स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी निभावली होती .त्या वेळच्या दसरा मेळाव्यात स्व.बाळासाहेब आपल्या भाषणात बोलले होते .भिमसेना आणि शिवसेना एकत्र आली आहे .या सेनेला रोखणे कोणालाही शक्य नाही .

 

 

 

लोकांनी या युतीला A .T .M .म्हटले आहे , म्हणजे आठवले , ठाकरे आणि मुंडे ..! नशीब आमच्या युतीला H I V नाव ठेवले नाही .???????????? साहेबांचं भाषण म्हणजे हंशा अन टाळ्या असाच माहोल असायचा . स्व बाळासाहेब जाहीर सभेत प्रचंड जनसमुदाया समोर समोरच्याचा शिवराळ भाषेत समाचार घेत तेही जनता डोक्यावर घेई . कारण तो ठाकरी बाणा होता … ती ठाकरी भाषा होती … ती ठाकरी शैली होती .. खुर्ची ..गादी ,पद ,प्रतिष्ठा ,मान सन्मान , ओळख हे आपल्याला घराण्याच्या पुण्याईने मिळू शकतात .पण वकृत्व , जनतेचे प्रेम ,लाखों – लाखोंच्या संख्येने जमलेल्या अमाप जनता सागराला संबोधतांना … जमलेल्या माझ्या …तमाम हिंदू बांधवांनो ,भगिनींनो आणि मातांनो … ही आत्मीयतेची हाक आणि त्यानंतर समोरून येणारा जनसागराच्या लाटेचा आवाज स्व. बाळासाहेब यांच्या नंतर फक्त मा. राजसाहेबांच्या तोंडून शोभतो …. क्रमशः

अध्यक्ष – प्रेरणा दर्पण फाऊंडेशन , चोपडा (9822325717)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here