सिंहगड रोडवरील खूनाचा झाला उलगडा, चारही आरोपींना पोलिसांनी केली अटक

murder

पुणे (सुनिल भोसले) – नरवीर तानाजी मालुसरे (सिंहगड) रोडवरील नांदेड येथे शनिवारी पहाटे रक्ताच्या थारोळ्यात आढळलेल्या तरुणाच्या खुनाचा उलगडा झाला आहे. मैत्रिणीबद्दल अपशब्द वापरले म्हणून तरुणाचा खून केला. यश मिलिंद कांबळे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

 

 

नांदेड परिसरात यश शनिवारी पहाटेच्या सुमारास रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता. त्याची हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. या हत्या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली.

 

 

 

मैत्रिणीबद्दल अपशब्द वापरले म्हणून रागाच्या भरात चौघांनी यशला लाकडी दांडक्याने मारहाण केली होती. त्यात यशचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. चारही आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपींनी हत्येची कबुली दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here