मराठी पंचांग : सोमवार, १९ ऑक्टोबर २०२० – शुभ – अशुभ मुहूर्त

panchang

भारतीय सौर २७ आश्विन शके १९४२, निज आश्विन शुक्ल तृतीया दुपारी २.०८ पर्यंत, चंद्रनक्षत्र: अनुराधा उत्तररात्री ३.५१ पर्यंत, चंद्रराशी : वृश्चिक, सूर्यनक्षत्र: चित्रा, सूर्योदय: सकाळी ६.३५, सूर्यास्त: सायं. ६.११, चंद्रोदय: सकाळी ९.००, चंद्रास्त: रात्री ८.३७.

 

 

 

 

आजचे शुभ मुहूर्त :
अभिजित मुहूर्त : सकाळी ११ वाजून ४३ मिनिटे ते दुपारी १२ वाजून २८ मिनिटे.
विजय मुहूर्त : दुपारी ०२ वाजेपासून ते ०२ वाजून ४५ मिनिटे.
निशिथ काळ : रात्रौ ११ वाजून ४१ मिनिटे ते १२ वाजून ३१ मिनिटे.
अमृत काल : सकाळी ०६ वाजून २७ मिनिटे ते ०७ वाजून ५४ मिनिटे.
सर्वार्थ सिद्धि योग : सूर्योदयापासून ते उद्या पहाटे ०३ वाजून ५३ मिनिटे.

आजचे अशुभ मुहूर्त :
राहु काळ : सायंकाळी ०७ वाजून ३० मिनिटे ते ०९ वाजेपर्यंत.
यमगंड : सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते दुपारी १२ वाजेपर्यंत.
गुलिक काळ : दुपारी ०१ वाजून ३० मिनिटे ते ०३ वाजेपर्यंत.

 

 

 

आजचे राशिभविष्य

मेष : जोडीदाराच्या दिलदार वृत्तीची प्रशंसा करा. कोणाकडून फसले जाणार नाही याची पूर्व शहानिशा करा. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळण्याची शक्यता. व्यापारी वर्गाने नवीन गोष्टी अमलात आणण्यासाठी प्रयत्नशील राहावे. याचा भविष्यात लाभ मिळू शकेल.

वृषभ : दोघांच्या भांडणात पडू नका. घरामध्ये खबरदारी देऊन काम करा. दिवसभरात काही ना काही समस्यांना सामोरे जावे लागू शकेल. मन शांत करून कार्यरत राहावे. कार्यालयातील सहकाऱ्यांशी वाद होऊ शकेल. दिवसाच्या उत्तरार्धात धैर्याने परिस्थिती हाताळणे हिताचे राहील. शेजारी मदत करतील.

मिथुन : मनातील चुकीच्या विचारांना हद्दपार करा. आपली उपासना सफल होईल. आजचा दिवस विशेष ठरेल. मेहनतीचे चीज होईल. नोकरदार वर्गाला किंवा व्यवसायिकांना शुभवार्ता मिळू शकतील. कार्यक्षेत्रात विशेष मान, सन्मान मिळू शकतील. घाईने निर्णय न घेणे हिताचे ठरू शकेल.

 

 

 

कर्क : स्थावर मालमत्तेत पैसा गुंतवला जाईल. वडीलधार्‍या मंडळींची काळजी घ्या. दिनक्रम अतिशय व्यस्त राहू शकेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. भौतिक सुखाचा आनंद घ्याल. बुद्धी, विवेक, नवनवीन कार्याच्या शोधासाठी उपयुक्त ठरतील. समोरच्या व्यक्तींमधील चुका शोधणे सोडल्यास दिवस उत्तमरित्या पार पडू शकेल.

सिंह : घरामध्ये शांततेचे वातावरण राहील. नवीन नोकरीच्या संधी दिसून येतील. मौल्यवान वस्तू प्राप्त होऊ शकेल. आवडत्या वस्तूंच्या खरेदी कराल. गरजूंना मदत करणे हिताचे ठरू शकेल. संवाद कौशल्याने समोरच्या व्यक्तींवर प्रभाव पडू शकेल. कुटुंबासोबत उत्तम काळ व्यतीत होईल. वाणीतील मधुरता नातेसंबंध घट्ट करू शकेल.

कन्या : कष्टाच्या दुप्पटीने यश मिळेल. वडिलोपार्जित धंदा पुढे चालवल्यास फायद्याचे ठरेल. स्पर्धेत विजय शक्य. पराक्रमात वाढ होऊ शकेल. दिवसाच्या उत्तरार्धात अचानक खर्च उद्भवू शकतील. तर, दुसरीकडे प्रलंबित येणी प्राप्त होण्याचे योग आहेत.

 

 

 

तुळ : अनावश्यक खर्च कमी करा. नवीन व्यवसायात सावधानतेने पावले टाका. अधिक परिश्रमांचा आरोग्यावर परिणाम होऊ शकेल. कुटुंबाचे, मित्रांचे योग्य सहकार्य लाभू शकेल. शुभवार्ता मिळतील. नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस. अधिकारात वृद्धी होईल. पण, जबाबदाऱ्याही वाढतील. कार्यक्षेत्रात कौतुक, प्रशंसा होईल.

वृश्चिक : आपण केलेला संकल्प पूर्ण होईल. आपले विचार लोकांसमोर प्रकट करा. आजचा दिवस संमिश्र असेल. पोटाचे विकार त्रस्त करू शकतील. अनावश्यक खर्च उद्भवतील. एखाद्या प्रसंगामुळे चिडचिड संभवते. मात्र, संयम आणि धैर्याने परिस्थिती हाताळणे हिताचे ठरू शकेल. दिवसाच्या उत्तरार्धात एखादी शुभवार्ता उत्साह वाढवेल. मन प्रसन्न राहील.

धनु : आपला आत्मविश्वासात कायम ठेवा. घरासंबंधी काही कामे काढली असतील तर ती पूर्ण करा. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. धार्मिक कार्याचे आयोजन होऊ शकेल. भौतिक सुखाची अनुभूती घेऊ शकाल. प्रलंबित येणी प्राप्त होऊ शकतील. आहारावर नियंत्रण ठेवणे हिताचे ठरू शकेल.

 

 

 

मकर : आपला संयम आपल्या कामी येईल. दरवेळेस अति साहस दाखवू नका. आपल्या निर्णय क्षमतेचा आपल्याला लाभ मिळू शकेल. एखादा जुना वाद संपुष्टात येऊ शकेल. व्यवसायासाठी करत असलेले प्रयत्न भविष्यात फायदेशीर ठरू शकतील. यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त होऊ शकतील. शेअर बाजारातील गुंतवणुकीतून लाभ मिळू शकेल. मन प्रसन्न राहील.

कुंभ : नोकरीत कामाकडे संपूर्ण लक्ष द्या. आपल्या चातुर्याचे कौतुक होईल. भविष्यातील एखाद्या नव्या योजनेवर भर राहील. कार्यालयात अधिकारी वर्गाच्या मदतीमुळे कामे यशस्वी होतील. व्यवसायिकांना अधिक मेहनत घ्यावी लागेल. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला मोलाचा ठरू शकेल. दिवसाचा उत्तरार्ध उत्तम संगीताचा आस्वाद घेऊ शकाल.

मीन : नवीन नोकरीची संधी सापडेल. छोटे प्रवास संभवतात. हितशत्रूंचा त्रास संभवतो. दिवसभर काही ना काही कारणाने मन विचलित राहू शकेल. मुलांसोबतचे नातेसंबंध दृढ होऊ शकतील. पदोन्नतीचे योग प्रबळ. दिवसाचा उत्तरार्ध उत्तम ठरू शकेल. अतिथींचे आगमन होण्याची शक्यता.

 

तिसरी माळ : शत्रुवर विजयाचा शुभाशिर्वाद देणारी चंद्रघंटा देवीchandraghata-devi

अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या कालावधीत साजऱ्या केल्या जाणाऱ्या नवरात्रातील तिसरा दिवस चंद्रघंटा देवीला समर्पित आहे. नवदुर्गेतील चंद्रघंटा देवी दुर्गा देवीचे तिसरे स्वरुप मानले जाते. नवरात्रात तिसऱ्या दिवसाच्या पूजेला विशेष महत्त्व असल्याचे सागितले जाते. सन २०२० मध्ये १७ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे. सोमवार, १९ ऑक्टोबर २०२० रोजी नवरात्राची तिसरी माळ असून, चंद्रघंटा देवीची महती, स्वरुप, महात्म्य, महत्त्व, पूजाविधी…

 

 

चंद्रघंटा देवीच्या ललाटावर चंद्र शोभायमान असल्यामुळे दुर्गा देवीच्या या स्वरुपाला चंद्रघंटा असे संबोधले जाते. दुर्गा देवीचे चंद्रघंटा स्वरुप कल्याणकारी आहे. चंद्रघंटा देवी दशभुजा आहे. देवीच्या गळ्यात पांढऱ्या फुलांची एक माळ आहे.
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी लवकर उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यावे. यानंतर व्रताचा संकल्प करून पूजन करावे. चंद्रघंटा देवीचे पूजन करताना पिवळ्या किंवा सोनेरी रंगाची वस्त्रे परिधान केल्यास उत्तम. तसेच चंद्रघंटा देवीला पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. यामध्ये खीर, बर्फीचा आवर्जुन वापर करावा, असे सांगितले जात आहे. याशिवाय देवीला मध अर्पण करावा, असे म्हटले जाते.

 

 

 

चंद्रघंटा देवीचे पूजन करताना पुढील मंत्र म्हणावा.
पिण्डजप्रवरारूढ़ा ण्डकोपास्त्रकेर्युता।
प्रसादं तनुते मह्यं चंद्रघण्टेति विश्रुता॥
या देवी सर्वभूतेषु मां चंद्रघंटा रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमो नम:।।
भूतलावर धर्माचे रक्षण आणि अंधःकार दूर करण्यासाठी चंद्रघंटा देवी प्रकट झाली, असे सांगितले जाते. या देवीची उपासना, आराधना केल्यास आध्यात्मिक आणि आत्मिक शक्ती प्राप्त होऊ शकते. यासह तिसऱ्या दिवशी केलेल्या दुर्गा सप्तशती पठणामुळे उपासकांना यश, प्रगती, कीर्ती, मान, सन्मान प्राप्त होऊ शकतात, असे सांगितले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here