ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – एकनाथ खडसे भाजपासोबतच राहतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिलं होतं.
ज्यावर एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरण देत मी राजीनामा दिला नसल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही एकनाथ खडसे भाजपा सोडणार नाहीत असं म्हटलं आहे. मी महाराष्ट्र भाजपाचा प्रदेशाध्यक्ष आहे. माझ्याकडे त्यांचा राजीनामा आलेला नाही. तसंच इतर कुणाचाही राजीनामा आलेला नाही असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. एकनाथ खडसे हे आमचे वरिष्ठ नेते आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं.
एकनाथराव खडसे घटस्थापनेच्या मुहुर्तावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र त्यानंतर विजयादशमी किंवा त्याआधी एकनाथ खडसे भाजपाला राम राम करुन राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्याही चर्चा रंगल्या.
आज काही प्रसारमाध्यमांनी एकनाथराव खडसे यांनी भाजपा सोडल्याच्या बातम्या चालवल्या. यानंतर एकनाथराव खडसे यांनी स्पष्टीकरण देत मी भाजपा सोडलेलं नाही आणि राजीनामा दिलेला नाही असं स्पष्टीकरण दिलं आहे.
दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी यावर स्पष्टीकरण देत माझ्याकडे कोणताही राजीनामा आलेला नाही. तसंच एकनाथ खडसे हे पक्षासोबतच राहतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.







