अहमदनगर (प्रतिनिधी) – भारतीय डाक विभागा मार्फत नोव्हें. २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या “ढाई आखर— प्रिय बापू आप अमर है।” या पत्रलेखन स्पर्धेत महर्षी ग.ज.चितांबर विद्यालय अ. नगर येथील हिंदी विषयाच्या अध्यापिका सौ.कल्पना शरद काळोखे यांनी महाराष्ट्रात २रा क्रमांक पटकावला. त्यांना १००००/_ रु. रोख पारितोषिक मिळाले आहे.
डाक विभागाचे वरिष्ठ अधिक्षक जे. टी.भोसले ,त्यांचे सहकारी श्री. हडगल, श्री. भोंगले यांनी अभिनंदन केले व नगरला हे यश मिळाले याचा आनंद व्यक्त केला.संस्थेचे अध्यक्ष श्री. साताळकर, सचिव निलेश वैकर, सहसचिव अविनाश धर्माधिकारी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. लाड शालेचा सर्व स्टाफ विद्यार्थी यांनी अभिनंदन केले. तसेच समाजातील सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
Home Uncategorized पत्रलेखन स्पर्धेत नगरच्या अध्यापिका मा.सौ कल्पना शरद काळोखे यांनी राज्यात दुसरा क्रमांक...







