कर्तव्याप्रति समर्पणाची भावना ठेवणारी रणरागिणी मीनाक्षी महाडिक

meenakshi-mahadik

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – कर्तव्याप्रति समर्पणाची भावना असेल, तर साधा कॉन्स्टेबलही वरिष्ठ अधिकाऱ्यांपेक्षा अधिक चांगले काम करू शकतो. अनुभवातून आलेले शहाणपण अनेकदा डिग्रीतून मिळतेच असे नाही. याची प्रचिती सहकारनगर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस नाईक मीनाक्षी महाडिक यांनी आपल्या कार्यातून दिली आहे.

 

 

 

मीनाक्षी महाडिक या गेली १७ वर्षे शहर पोलीस दलात पोलीस नाईक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी सुरुवातीला वाहतूक शाखेत काम केले़ त्यांच्या कामाची पद्धत व टापटीपपणा म्हणून त्यांची तब्बल १० वर्षे बदली केली गेली नाही. सहकारनगर पोलीस ठाण्यामध्ये २८ ऑक्टोबर २०१६ मध्ये त्यांची सर्व्हेलन्स विभागात बदली करण्यात आली. सर्व्हेलन्स विभागात काम करणाऱ्या या एकट्या महिला कर्मचारी आहेत़ सहकारनगर पोलीस ठाण्यात गेल्या. meenakshi-mahadik-pune

 

 

 

तीन वर्षांपासून काम करीत असताना त्यांनी १४ एमपीडीए केसेस केल्या. त्यापैकी १२ यशस्वीपणे लागू झाल्या. ४२ जणांना तडीपार केसेस तयार केल्या. दरवर्षी २०० ते २५० जणांवर प्रतिबंधक कारवाया त्यांच्याकडून केल्या जातात. त्यांचे हे काम पाहून पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांनी गुन्हेगारांवर पाळत ठेवण्यासंदर्भात कसे काम केले पाहिजे, हे सर्वांना माहिती व्हावे, यासाठी त्यांचे व्याख्यान ठेवण्याची कल्पना पोलीस आयुक्त डॉ़.के. व्यंकटेशम यांच्याजवळ बोलून दाखविली. त्यांनाही कल्पना आवडली आणि त्यांनी महाडिक यांचे व्याख्यान वरिष्ठांसाठी ठेवले.

 

 

सहकारनगर पोलीस ठाण्याच्या भेटीदरम्यान मीनाक्षी महाडिक यांना त्यांच्या हद्दीतील सर्व गुन्हेगारांची कुंडली माहिती असल्याचे दिसून आले. त्यांना त्यांच्या विषयाची परिपूर्ण माहिती असल्याचे लक्षात आहे. त्यांनी हे ज्ञान प्रयत्नपूर्वक मिळविले आहे. बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी त्या स्वत: त्यांच्या पालकांना जाऊन भेटतात. पोलीस ठाण्याच्या सर्व मोहिमेत त्या सहभागी असतात. अशा या कर्तव्यप्रती समर्पणाची भावना असणाऱ्या पोलिसातील रणरागिणीला बुलंद पोलीस टाइम्सचा सलाम!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here