अलवर (राजस्थान) – स्पा सेंटरच्या आडून सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा अलवर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. राजस्थानातील अलवर जिल्ह्यातील भिवाडीमध्ये बेकायदा स्पा सेंटरमध्ये देहव्यापार सुरू होता. पोलिसांनी नऊ महिलांसह १२ जणांना अटक केली आहे. त्यांची चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, भिवाडीमध्ये स्पा सेंटरच्या आडून सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी स्पा सेंटरवर कारवाई केली. तेथून नऊ तरुणींसह अन्य तीन तरुणांना अटक केली आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, भिवाडीच्या पोलीस अधीक्षकांच्या आदेशांनंतर पोलीस ठाण्याचे प्रभारी हरिराम कुमावत यांनी बोगस ग्राहक पाठवून स्पा सेंटरमध्ये देहव्यापार सुरू असल्याची खात्री करून घेतली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने छापा मारला. येथील दोन स्पा सेंटरमधून नऊ तरुणींना ताब्यात घेतले. या स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली देहव्यापार सुरू असल्याचे स्पष्ट झाले. याआधीही या दोन स्पा सेंटरवर पोलिसांनी कारवाई केली आहे. तरीही येथे सेक्स रॅकेट सुरू होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाही केली जात आहे, अशी माहिती कुमावत यांनी दिली.







