धरणगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – येथील मोठा माळीवाडा परिसरात प्रभाग क्रमांक 1 मध्ये नुकताच पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या शुभारंभ माळी समाज अध्यक्ष विठोबा माळी यांच्या हस्ते करण्यात आला.
धरणगाव येथील प्रभाग क्रमांक 1 हा माळीवाडा परिसर असून रस्त्या अति खराब झालेला होता शेतकरी बांधवांना व महिलांना येण्या-जाण्यासाठी त्रास होत होता ही बाब लक्षात घेऊन माजी प्रभारी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेविका सुरेखा विजय महाजन यांनी तात्काळ त्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसवण्यासाठी प्रस्ताव तयार करून पेव्हर ब्लॉक बसवून दिले.
या आधी 40 लाख रुपये किमतीचे पेव्हर ब्लॉक बसवण्यात आले होते. सदर कार्यक्रम प्रसंगी जिल्हा प्रमुख गुलाबरावजी वाघ,उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील सर,नगराध्यक्ष निलेश चौधरी,मा.नगराध्यक्ष सुरेश नाना चौधरी,चर्मकार समाजाचे नेते भानुदास आप्पा विसावे,शहर प्रमुख राजेंद्र महाजन,विजय महाजन,निंबाजी महाजन,भरत चौधरी,वासुदेव चौधरी,दशरथ महाजन,योगराज महाजन,रवींद्र जाधव,नंदू पाटील,व्ही टी माळी सर, लक्ष्मण महाजन,संतोष महाजन, धीरेंद्र पुर्भे,विशाल महाजन, वि.का.सो.चेअरमन पंढरीनाथ महाजन,सभा महाजन,आदी उपस्थित होते.सुत्रसंचलन व्ही टी माळी सर यांनी केले.







