आईनेच आवळला नवजात मुलीचा गळा

mother-kill-girl-child

सांगली (प्रतिनिधी शरद मोरे) – केवळ ४१ तासांपूर्वी जन्मलेल्या मुलीचा आईनेच गळा आवळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. शनिवारी रात्री निर्दयी आईने गळा आवळला होता. रविवारी रात्री मुलीचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात आईविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सुमित्रा गंगाप्पा जुट्टी (वय ३०, रा. यलापूर, जि. बेळगाव) असे निर्दयी आईचे नाव आहे.

 

 


याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सुमित्रा प्रसूतीसाठी सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. ४१ तासापूर्वी तिने एका मुलीला जन्म दिला. त्यांनंतर शनिवारी रात्री सुमित्राने मुलीचा गळा आवळल्याची माहिती वार्डमधील एक महिलेने डॉक्टरना दिली.

 

 

त्यांनतर परिचारिका उपचारासाठी मुलीला घेण्यासाठी गेल्या. त्यावेळी मुलीच्या गळ्यावर व्रण आढळून आले. नंतर मुलीवर उपचार सुरू करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना रविवारी रात्री मुलीचा मृत्यू झाला. याप्रकरणी रूग्णालय प्रशासनाने विश्रामबाग पोलिसांना माहिती दिली असता मध्यरात्री सुमित्रावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here