धरणगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – धरणगाव न.पा.च्या स्वीकृत सदस्यपदी शिवसेना शहर प्रमुख श्री राजेंद्र किसन महाजन यांची निवड करण्यात आली. राजेंद्र महाजन हे 1984 पासून शिवसेनेत सक्रिय सदस्य आहे व 5 वर्षांपासून शिवसेना शहर प्रमुख आहेत.
त्यांच्या कार्यकाळात .ना.गुलाबरावजी पाटील यांनी पहिल्यांदा धरणगाव शहरात 3200 मताच्या लीड मिळवून 45 हजार मतांनी निवडून आलेत. त्यानंतर लोकनियुक्त नगराध्यक्ष कै.सलीम पटेल यांच्या निधनानंतर लोकनियुक्त नगराध्यक्षाचा पदासाठी दावेदार असताना व 14 नगरसेवक निवडून आल्यामुळे लोकनियुक्त नगराध्यक्ष निवड फक्त औपचारिक होते तरी सुद्धा वरिष्ठांच्या आदेशान्वये त्यांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या फॉर्म मागे घेऊन निलेश चौधरी यांना संधी दिली व नाराज न होता त्यांना 3900 मतांनी निवडून आणण्यात त्यांच्या सिहाचा वाटा होता कोणताही लहानातल्या लहान व मोठ्यातल्या मोठा कार्यक्रम असला म्हणजे मंत्री महोदय राजू महाजन यांच्यावर हक्काने जबाबदारी टाकून कार्यक्रमाचे नियोजन त्यांच्यावर सोपून देतात व राजू महाजन सुद्धा कार्यक्रम सर्वांच्या सहकार्याने यशस्वी करण्यात त्यांचे प्रयत म्हणून त्यांच्या स्वीकृत सदस्य पद देण्यात आले.
त्यांच्या निवडीबद्दल पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांनी अभिनंदन केले त्यांच्या सत्कार न.पा कार्यालयात जिल्हाप्रमुख गुलाबरावजी वाघ, उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील सर,नगराध्यक्ष निलेश चौधरी,भानुदास विसावे,गटनेते पप्पू भावे यांनी केला.
या प्रसंगी नगरसेवक वासुदेव चौधरी,विजय महाजन,उपनगराध्यक्ष विलास महाजन,सुरेश महाजन,अजय चव्हाण,संजय चौधरी,पत्रकार भरत चौधरी,वाल्मीक पाटील, प्रशांत देशमुख,विलास पवार,भागवत चौधरी,करण वाघेरे,अरवींद्र चौधरी, विनोद रोकडे,कमलेश बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते.







