वाशी नवी मुंबई पोलिसांची कारवाई
पनवेल (प्रतिनिधी विकास राठोड) – दिनांक 22/10/2020 रोजी मा. श्री. सुरेश मेंगडे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 1, वाशी, नवी मुंबई यांचे आदेशाने गुन्हे प्रतिबंध व्हावा या उद्देशाने वाशी टोल नाका येथे रात्री 01.30 वा. सुमारास वाशी पोलीस ठाणेचे श्री. रविंद्र दौंडकर, पोलीस निरीक्षक ( गन्हे) व परिमंडळ 1. वाशी चे श्री. जी.डी. देवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि परिमंडळ 1 पथक कडील स्टाफ असे नाकाबंदी कर्तव्य पार पाडत असताना 01.30 वा. सुमारास एक महिंद्रा कंपनीचा बंद बॉडीचा पिकअप वाहन क्रमांक MH-12-QW-5031 घेवुन चालक व त्याच्या शेजारील इसम हा वाशी टोल नाका येथे संशयास्पद स्थितीत दिसून आले. गाडी थांबवून त्या गाडीत काय माल आहे ? याबाबत चौकशी केली असता त्यांनी चांदी व इमिटेशन ज्वेलरी असल्याचे सांगितले.
त्यावरुन त्यांना वाशी पोलीस ठाणे येथे आणुन वस्तु व सेवाकर विभाग, सीबीडी, बेलापुर, नवी मुंबई येथीलअधिकाऱ्यांना बोलावून टेम्पो मधील मालाची पाहणी केली असता त्यामध्ये एकूण 929 किलो 414 ग्रॅम चांदी व इमिटेशन ज्वेलरी असा एकुण 6,17,77,418/- कोटीचा ऐवज मिळुन आला. सदर चांदीचा ऐवज हा कुरीयर सेवेच्या माध्यमातुन पुणे, कोल्हापुर व इतर ठिकाणी जी.एस.टी. न भरता किंमती ऐवज वाहतुक करीत असल्याचे निष्पन्न झाले. सदरचा मुद्देमाल वस्तु व सेवाकर विभागाने इन्व्हेंटरी पंचनामा करुन पोलीसांच्या ताब्यात दिले. पोलीसांनी योग्यरित्या कायदेशिर कारवाईसाठी टेम्पोसह ताब्यात घेतलेला आहे. सदर जप्त मुद्देमालाची वस्तू व सेवाकर विभाग यांचे मार्फत चौकशी करुन पुढील योग्यती कार्यवाही करीत आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, श्री. बिपीनकुमार सिंग, मा. पोलीस सह आयुक्त डॉ.श्री. जय जाधव, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 1, वाशी श्री. सुरेश मेंगडे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, वाशी विभाग श्री. विनायक वस्त, मा.सहाय्यक पोलीस आयुक्त, तुर्भे विभाग, श्री. भरत गाडे, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाशी पोलीस ठाणे, संजीव धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ( गुन्हे) श्री. रविंद्र दौडकर, व परिमंडळ 1 पथक, वाशी चे सपोनि श्री. जी.डी. देवडे आणि पोहवा 808/ए.एच,ठवळे, मपोहवा 1548/ए.एस.कारखिले, पोहवा 140/जगदाळे, पोना 194/एस.ए.ठाकुर, पोना 1848/ए.सी.वारे, पोना 3129/एन.एन.नाईक, पोना 2642/व्ही.के,कामडी, पोना 2154/शरद खराडे, पोशि 3034/व्ही.व्ही.गायकवाड, पोशि 3251/एस.ई.सोनावणे. मपोशि 3371/ए.एस.पवार, पोशि 12066/हासे यांनी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे.







