कॉन्ट्रक्टरचा खून करुन पळुन जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीस शिताफीने पकडले

thane-police

कासारवडवली पोलीसांची कामगिरी

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – कासारवडवली पोलीस स्टेशन हद्यीतील सुकुर रेसिडेन्सी कॉम्पलेक्स इमारत क्रमांक ए १ चे प्रवेशद्वारा समोर आनंद नगर घोडबंदर रोड ठाणे येथे आरोपी नामे सुरज पन्नालाल सरोज वय २३ वर्षे धंदा-प्लंबर राहणार इंदिरा नगर वागळे इस्टेट, ठाणे याने त्याचा दुरचा नातेवाईक आणि प्लम्बिंगचे काम करणारा कंत्राटदार विजय राम उजागीर सरोज वय ३८ वर्षे राहणार मोघरपाडा ठाणे यास मजुरीचे उधारीचे पैसे दिले नाहीत या कारणावरून दिनांक २२/१०/२०२० रोजी सकाळी १०.०० वा.चे सुमारास . प्लम्बिंग पाईप पान्हयाने डोक्यात अनेक घाव घालुन डोके फोडून गंभीर दुखापत करून जीवे ठार मारले आहे.

 

सदरबाबत कासारवडवली पोलीस स्टेशन गुन्हा रजि कं. २६५/२०२० भा.द.वि. कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. खुन करतांना वापरलेले हत्यार प्लम्बिंग पान्हा आरोपीकडुन हस्तगत करण्यात आला आहे. अटक आरोपीस मा. न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यास दिनांक २८/१०/२०२० रोजी पर्यंत पोलीस रिमांड देण्यात आली आहे.
गुन्हा करून आरोपी परराज्यात पळून जाणेचे तयारीत असल्याची गुप्त माहिती वपोनि किशोर खैरनार यांना मिळाल्याने त्यांनी तात्काळ गुन्हे प्रकटिकरण पथकाचे अधिकारी/कर्मचारी पाठवन सदर आरोपीस शिताफीने अटक केली आहे.

 

 

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. विवेक फणसळकर, मा. सह पोलीस आयुक्त श्री. अनिल कुंभारे, मा. पोलीस उप-आयुक्त परि-५ श्री. अविनाश अंबुरे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त वर्तकनगर विभाग श्री. पंकज शिरसाट यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि किशोर खैरनार यांचे नेतृत्वाखाली करण्यात आली आहे. सदर आगेगीय सपोनि/सागर जाधव, मपोउपनि/रूपाली रत्ने, पोहवा/५०४७ खरात, पोहवा/६२१७ पाटील. पोना/१२६३ तायडे, पोना/१७८ महापुरे सर्व नेमणुक कासारवडवली पोलीस स्टेशन यांनी वानि याने मार्गदर्शनाखाली तात्काळ अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here