गावाच्या विकासाला सर्वांची साथ हवी व एकजुटीसह श्रध्देची जोड हवी ! – ना.गुलाबराव पाटील

gulabrao-patil

पष्टाणे बु येथील ग्रा,पं 14 वा युक्तआयोग व दलित वस्ती योजना अंतर्गत ना गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते उदघाटन सोहळा

 

धरणगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – कोणत्याही गावाचा विकासाला सर्वांची साथ हवी व एकजुटीसह श्रध्देची जोड हवी असे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते पष्टाने येथील उदघाटना प्रसंगी आयोजित कार्यकमात बोलत होते.

राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज पष्टाने येथील 14 वा युक्त आयोग व दलित वस्ती योजना अंतर्गत काँगरेटिकरन करणे व फेव्हर ब्लॉक बसवणे या कामाचा उदघाटना शुभारंभ याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की,या पुढील काम आपण लवकरचं मार्गी लावणार आहोत असे सांगितले व याच्या जोडीला गावकर्‍यांची एकजुट हवी आणि ना. पाटील पुढे म्हणाले की, गावाच्या विकासात राजकारण आणता कामा नये. सर्वांनी एकोप्याने मिळून काम केल्यास गावाचा खर्‍या अर्थाने विकास होत असतो.gulab-patil

 

यावेळी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी धरणगाव ते सोनवद व आजूबाजूचा परिसरातील सर्व कामे पूर्ण केल्याबद्दल व शेत रस्त्यांच्या कामांना सुरुवात केल्याबद्दल पष्टाने ग्रामपंचायत, विकास सोसायटी, शेतकरी व ग्रामस्थान मार्फत पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

 

सदर कार्यक्रम प्रसंगी शिवसेना जिल्हा अध्यक्ष गुलाबरावजी वाघ साहेब , प्रेमराज बापू , तालुका प्रमुख, गजानन नाना व डी,ओ,पाटील साहेब शिवसेना शाखा प्रमुख व ग्रा,पं सदस्य संजय ठाकरे,सरपंच प्रकाश सोनवणे ग्रा,पं सदस्य,अरविंद जाधव सुनील पाटील,शरद जाधव,हिरामण नाईक व ग्रामसेवक देवरे आप्पा,रविंद्र ठाकरे, शुभम ठाकरे,ललित ठाकरे,जयेश ठाकरे,गौरव पाटील ,विशाल ठाकरे,मच्छिंद्र मराठे ग्रामपंचायतील सर्वे सदस्य व पदाधिकारी परिसरातील सोसायटी चेअरमन सदस्य यांच्या सह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here