धरणगाव येथे कर्णबधिर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिघ्रनिदान व उपचार केंद्र स्थापन

p-m-patil

धरणगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – येथे 0 ते 6 वयोगटातील कर्णबधिर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय विभाग दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे व जिल्हा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत जवाहर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित के जी गुजराथी मूकबधिर निवासी या विद्यालयात शिघ्रनिदान व उपचार केंद्राचे उद्घाटन मा.श्री निलेश भाऊ चौधरी लोकनियुक्त नगराध्यक्ष यांच्या हस्ते व मतिमंद निवासी व अनिवासी विद्यालयात मतिमंद,मेंदूचा पक्षाघात, स्वमग्न व बहुविकलांग करिता शीघ्र निदान व उपचार केंद्राचे उद्घाटन मा.श्री प्रथमेश मोहोळ साहेब नायब तहसीलदार धरणगाव यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

 

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री गुलाबरावजी वाघ शिवसेना जळगाव जिल्हा प्रमुख होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.श्री पी एम पाटील सर शिवसेना उपजिल्हा प्रमुख जळगाव यांनी सदर उपक्रमाबद्दल माहिती दिली व योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. गुलाबरावजी वाघ यांनी सदर उपक्रम साठी आमच्या तर्फे जे काही सहकार्य लागेल ते आम्ही करून उपक्रमास शुभेच्छा दिल्या. dharangaon-p-m-patil
नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी सांगितले तालुक्यातील एकमेव दिव्यांग संस्था असून वर्षभर अनेक उपक्रम राबवीत असतात दिव्यांग विद्यार्थ्यांना भविष्यात त्रास होऊ नये त्यांचे निदान तात्काळ झाल्यास पुढे येणारे अडचणी निर्माण होणार नाहीत असे उत्कृष्ट काम एकाच छत्राखाली होत असल्याचा आनंद व्यक्त केला व संस्थेचे तसेच शीघ्रनिदान केंद्रास जे काही सहकार्य लागेल ते केले जाईल असे आश्वासन दिले.

 

मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक वाल्मीक पाटील सर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सादर केली तसेच मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक ऋषिकेश जाधव यांनी शिघ्रनिदान केंद्राचे विश्लेषित मार्गदर्शन विषद केले तसेच कार्यक्रमास प्रमुख पाहुणे संस्थेचे पदाधिकारी वसंत पाटील,एकनाथ पाटील,गट साधन केंद्र पंचायत समिती धरणगाव येथील जयदीप पाटील,दीपक पाटील,तालुका क्रीडा शिक्षक अध्यक्ष सचिन सूर्यवंशी,पत्रकार धर्मराज मोरे,आर डी महाजन,योगेश पी पाटील,सूत्रसंचालन संतोष भडांगे सरांनी केले व आभार आर एच पाटील सरांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नंदकुमार पाटील,किशोर पाटील, चंद्रराव पाटील,अनंत जाधव,दिलीप पाटील,उमेश पाटील,सरलाबाई बोरसे, कल्पना ठाकरे व आरिफ शाह यांनी परिश्रम घेतले व दोन्ही प्रवर्गातील शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here