सारंगखेड्यातील तरुणीचा खुन करणाऱ्या आरोपीस ६ तासात अटक

shahada-police

शहादा (प्रतिनिधी विजय निकम) – शुक्रवारी दिनांक २३/१०/२०२० रोजी सकाळी ०८.०० वाजता संतोष ब्रिजलाल सोनवणे रा.भूतबंगला परिसर, सारंगखेडा यांनी पोलीस ठाणे सारंगखेडा येथे येवन माहिती दिली की, त्यांची मुलगी (पिडीत) ही रात्री १२.३० वा. पासुन बेपत्ता असुन तिचा आसपास शोध घेतला, परंतु ती मिळुन आलेली नाही. या माहितीवरुन सारंगखेडा पो.स्टे. प्रभारी अधिकारी व त्यांचा स्टॉफ यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवुन तपास सुरु केला व या घटनेची माहिती वरिष्ठांना कळविली.

 

सदर माहिती मिळाल्यावर अपर पोलीस अधीक्षक श्री. विजय पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी श्री. किशोर नवले व त्यांची टिम, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी, शहादा, परि.सहा.पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश, परि. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. साळुखे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवुन तपास सुरु केला. सदर तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयीत आरोपी किशोर वडार वय-२० वर्षे रा. सारंगखेडा यास ताब्यात घेवून विचारपुस केला असता, मयत हिच्या सोबत प्रमसबध हात, परतु ही गोष्ट तिच्या कुटुंबीयांना मान्य नव्हती व पिडीत ही सुध्दा दरम्यानच्या काळात त्याला प्रतिसाद देत नव्हती व लग्न करण्यास तयार नव्हती या रागातुन रात्री १२.३० वा. दरम्यान तिला घराबाहेर बोलावुन माझ्या सोबत लग्न का करत नाहीस या रागातुन तिच्या गळ्यावर चाकुने वार करुन तिची हत्या केली व त्यानंतर तिचा मृतदेह घरापासुन दिड कि.मी. अंतरावरील ऊसाच्या शेतात लपविला, याची कबुली आरोपीने दिलेली आहे.

 

सदर गन्ह्यात भा.द.वि. कलम ३०२.२०१ तसेच अनुसूचीत जाती जमाती कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीस अटक करण्यात आलेले आहे. गुन्ह्यात वापरलेले हत्यार जप्त करण्यात आलेली आहे. सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने ६ तासांत गुन्हा उघडकिस आणुन आरोपीस जेरबंद केले आहे. सदर गुन्ह्याचा तपास प्रभारी उप-विभागीय पोलीस अधिकारी शहादा उप-विभाग हे करीत आहेत.

 

सदर घटनेच्या अनुषंगाने काही तरुण व संघटनांमार्फत सोशल मिडीयावर अफवा पसरविण्यात येत असुन त्यात कोणतेही तथ्य नाही. सदर अफवांवर विश्वास ठेवु नये व तसे मॅसेज पाठविणाऱ्या व्यक्तीची माहिती तात्काळ पोलीसांना द्यावी असे आवाहन नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here