जनमत प्रतिष्ठान व विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्याकडून तंट्या भिल वस्तीत भोजन वाटप

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – सद्यस्थितीतील कोरोनाच्या महामारीत प्रत्येक नागरिकाचे आरोग्य हीच त्याची प्रतिकारशक्ती आहे. आरोग्य सुदृढ राहण्याकरिता नियमित आहार मिळणे आवश्यक आहे. परंतु रोजगार बंद असल्याने, तंट्या भिल वस्तीतील राहिवाश्यांची जेवणाची गरज ओळखून जनमत प्रतिष्ठान, विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या काही दिवसांपासून भोजन वाटप करण्यात येत आहे.
शुक्रवार (दि.३) जनमत प्रतिष्ठान व विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या माध्यमातून तंट्या भिल वस्ती, कोंबडी बाजार येथे 200 लोकांना शेवभाजी भात बिस्कीट चॉकलेट वाटप करण्यात आले त्याप्रसंगी प्रमोद नेहेते ,नारायण पाटील भुसावळकर, विश्व हिंदू परिषद महामंत्री दिपकभाऊ दाभाडे व जनमत प्रतिष्ठान अध्यक्ष पंकज नाले उपस्थित होते त्याप्रसंगी प्रमोद नेहते यांना जनमत प्रतिष्ठान कडून सन्मान प्रमाणपत्रही देण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here