- दसऱ्याच्या दिवशी लोकांमध्ये निरूत्साह,बाजारपेठही कोमजल्या
- लोकप्रतिनिधींनीही भेटीगाठी टाळल्या, पुढच्या वर्षी पाया पडायला येतील
दोडाईचा (विशेष प्रतिनिधी) – करोना विषाणूसारख्या गंभीर परिस्थिती वर लस उपलब्ध नसतांना, खबरदारी घेत सरकारने,”माझे कुटूंब-माझी जबाबदारी” ही योजना राबवत, समाजातील सर्वच सामाजिक, सांस्कुतिक,व राजकीय कार्यक्रमांवर गर्दी होऊ नये म्हणून निर्बंध घालत कार्यक्रम घेण्यावर भर देण्यात आला आहे. म्हणून यावेळसचा “दसरा आला कुठे,आणि गेला कुठे” अशी परिस्थिती निर्माण होऊन, गरीबांसह इतरांचे दोघेही सोने महाग होऊन गेले आहेत. म्हणून या कठीण परिस्थितीत जनता आपल्याकडून अन्नधान्य, मदत ऐवजी, सोने तर मागणार नाही, ह्या भितीपोटी लोकप्रतिनिंधीनीही गोर-गरिब मतदार ,जनतेच्या भेटीगाठी टाळल्याचे दुर्ष्य गावात पहायला मिळाले,म्हणून पुढच्या दसर्याला पाया पळत मत मागायला येवू द्या, तेव्हा यांना यांची जागा दाखवतो,असेही करोना स्थितीवर आर्थीकद्रुष्टया हताश झालेल्या जागरूक नागरिकांमध्ये बोलले जात होते.
दिवाळी-दसरा सण म्हटला की,गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी व समाजातील सर्वच स्तरातील लोकांमध्ये एक चैतन्याची पहाट घेऊन येतो. चार महिन्यांनपासुन शेतात राबराब राबणाऱ्या शेतकर्याच्या घामासह मालाला कुठेतरी भाव मिळतो. मार्केटमध्ये आलेल्या मालाच्या माध्यमातून व्यापारी,हमाल,मापाडी ,व्यवसायिक अशा समाजातील सर्वच घटकापर्यंत हा पैसा फिरत असतो. म्हणून वर्षातुन येणारे इतर सणांपेक्षा दसरा-दिवाळीच्या बाजारपेठेतील खरेदीला खुपच महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र करोना विषाणूसारख्या गंभीर आजाराच्या खबरदारी पर पाश्वभुमीवर सर्वच सण, त्योहार फिके लागायला लागले आहेत. मागे नुकताच श्री गणेशाची स्थापना, नवरात्र, दसरा आदी सणांमध्ये असलेला ऊत्साह लोप पावत आहे.
आता नुसताच आजचा दसरा सण कुठे आला, कुठे गेला, दिसलाच नाही. दसर्याच्या दिवशी नवीन कपडे खरेदी करणे, वाईट गोष्टींचे रावण दहन करणे हे पण लोक विसरले. दसर्याला मध्यम वर्गीय व श्रीमंत लोक सोने खरेदी करतात ते ही महाग झाल्याने खरेदी मंदावली व गोगरिब ,सामान्य व्यक्ती दसर्याला आपल्या आप्तस्वकीयांना, मित्रपरिवाराला गोड गळाभेट करताना जी आपट्याची पाने सोने म्हणून द्यायची व गोरगरीब-विक्रीतुन दोन पैसे कमवायचे, यावर्षी तेही बाजारात व लोकांजवळ दिसेनासे झाले. म्हणून एक सोने पैसे खिशात असल्यावर महाग वाटत होते.तर दुसरे सोने खिशात पैसे असल्यावर दिसत नव्हते. म्हणून समाजातील दोघी फळींना “पास पैसा होणे के बाद”,.सोन्याचे महत्त्व कळाले.
दसऱ्याच्या दिवशी लोकांमध्ये निरूत्साह, बाजारपेठ कोमजल्या….
यावर्षी करोना स्थितीवर बाजारपेठा व बाजारपेठेतील दुकाना अनेकवेळा बंद चालू होत्या. आता कुठे जावून दसर्याच्या पाक्ष्वभुमीवर मागील चार दिवसापूर्वी गावातील गुरूवार रोजी भरणारा आठवडे बाजार पुर्ववत सुरू झाला आहे. म्हणून शेतकर्यांचा पिकवून ठेवलेला माल बाजारात आणत, भाव मिळवण्यासाठी जशी परिस्थिती होते.तशी दुकाना उघडून ग्राहकांअभावी दुकानदारांची परिस्थिती झाली आहे. म्हणून सकाळपासून कपड्यापासुन, सोने खरेदी सह इतर कोणत्याही दुकानांवर फारशी ग्राहकांची गर्दी दिसून आली नाही, एकीकडे ऐवढा मोठा सण असुनही निरूत्साहाचे वातावरण जनता व बाजारपेठेतील दुकानदारांमध्ये दिसले.
लोकप्रतिनिधींनी भेटीगाठी टाळल्या…।.
करोना काळात सर्वसामान्य व्यक्तींपासून ,दानशुर,लोकसेवक लोकांनी सुरुवातीच्या पहिल्या दुसऱ्या महिन्यात अन्नधान्य, इतर मदतीचा धो धो पाऊस समाजातील गोरगरीब लोकांवर पाडला. पण जसजसे लाँकडाऊन वाढत गेले. तसतसा मदतीचा पाऊस ओसरत गेला. मात्र लोकांना खरी मदतीची गरज आता आहे. अनेकांचे कुटुंब लाँकडाऊनमुळे उघड्यावर येऊन गेले आहे. अनेकांच्या हातातील काम ,नोकरी सुटलेले आहे. अनेकांचे धंदे, व्यवसाय बंद झालेले आहेत. अनेकजण मिळेल ते काम शोधून, कुटुंब चालवण्याचा प्रयत्न करत आहे,अशावेळेस लोकप्रतिनिधी लोकांनी भाबांवलेल्या जनतेला नका सोने-चांदी, रोकड, अन्नधान्यची मदत भलेही न करता, कमीतकमी दसर्यानिमित्त भेटगाठ करून मानसिक द्रुष्टया सक्षम करण्यासाठी मोटीव्ह तरी केले पाहिजे होते. मात्र ह्या लोकांनी दसर्यासारख्या दिवशी भेटी नाकारल्या व एक एक कुटूंब प्रमुखाच्या भेटीही घेतल्या नाही. एकीकडे सरकार “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” माध्यमातून मोहीम राबवून लोकांच्या घरापर्यंत पोहचत आहे. दुसरीकडे हे लोकप्रतिनिधी भेटीगाठीपासुन तोंड फिरवत आहे. जसे जनता यांच्याकडून गडगंज पैसा, प्राँपर्टी मागून घेईल, असे त्यांना वाटत आहे,आणि हिच परिस्थिती निवडणुकीच्या वेळेस राहिली असती. तर हया लोकांनी करोना बिरोनाची भिती फोडत, मतांसाठी मतदारांचे पाया पडले असते,असा सुर नागरिकांमध्ये दसर्याच्या निरूत्साही वातावरणात निघत होता.म्हणून पुढे होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीत जनता कोणाकडून काय हिशोब घेईल ,हे सागंता येत नाही, असेही अनेक गावातील सुज्ञ मंडळी बोलून दाखवत होती.




