भुसावळ (प्रतिनिधी गिरीश पवार) – भुसावळ बाजार पेठ पो स्टेशन गुरन 903/2020 भादवी कलम- 354-अ, सह बालकांचे लैगींक अपराधांपासुन संरक्षण अधिनियम 2012 कलम-8 प्रमाणे दिनांक 22/10/2020 रोजी 23.20 वा. गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्ह्यातील फरार आरोपी याची पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळाल्या गुप्त बातमी वरुन आरोपी नामे- कैफ खान सलीम सलीम खान उर्फ कानपुरी वय-18 रा.नसरवंजी फाईल सैलानी बाबा दर्गा जवळ भुसावळ हा चाळीसगाव परिसर भागातून सापडा रचून ताब्यात घेउन दि.25/10/2020 रोजी रात्री 2.32अटक केली आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक डाॅ.प्रवीण मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
ही कारवाई सहा.पो.नि.अनिल मोरे सर ,सहा.पो. नि.मंगेश गोटला सर पो.ना. समाधान पाटील,कृष्णा देशमुख ,रमण सुरळकर,किशोर महाजन,उमाकांत पाटील पो.काॅ.विकास सातदिवे,ईश्वर भालेराव,प्रशांत परदेशी, सचिन चौधरी, चेतन ढाकणे, योगेश महाजन, सुभाष साबळे यांनी केली असुन पुढील तपास सहा. पो.निरीक्षक श्री. अनिल मोरे, पो.ना.समाधान पाटील करीत आहेत.







