८ वर्षीय मुलीच्या गालावर दुकानदाराने घेतला चावा; पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

minor-harassment

अहमदाबाद – अहमदाबादमधील रखियालमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. चॉकलेट आणायला दुकानावर गेलेल्या आठ वर्षीय मुलीच्या गालाला ५५ वर्षीय दुकानदाराने चावा घेतला. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी रखियालमध्ये आपल्या पालकांसोबत राहते. तिला ११ वर्षांचा एक मोठा भाऊ आहे. तिचे वडील उद्योजक असून, अजितमिल क्रॉसरोडवर त्यांचा व्यवसाय आहे. तर तिची आई गृहिणी आहे. गेल्या बुधवारी दुपारी परिसरातील एका दुकानावर चॉकलेट आणण्यासाठी गेली होती. तिने दुकानदाराकडे चॉकलेट मागितले. त्यावेळी दुकानदाराने तिला पकडले आणि तिला आतमध्ये ओढले. त्याने मुलीच्या गालावर चावा घेतला.

 

मुलगी घरी गेल्यानंतर तिने घडलेला प्रकार पालकांना सांगितला. दुसऱ्या दिवशी मुलीचे वडील आणि आजोबा दुकानदाराकडे गेले आणि त्यांनी जाब विचारला. त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना बोलावले. रखियालचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here