स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अवैध गांजा वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक

pune-crime

सुमारे 4 लाख 20 हजार रु किमतीचा 28 किलो गांज्यासह एक कार असा एकूण 8 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त

पुणे (प्रतिनिधी नारायण शेळके) – आज दि २७/१०/२०२० रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांच्याकडून अवैध धंदे यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते .

 

या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक नेमण्यात आले होते . या पथकास गोपनीय बातमीदारामार्फत पांढऱ्या रंगाची कारमध्ये (एम एच १२ क्यू ए ४४७९) अवैधरित्या गांजा वाहतूक होणार असल्याचे समजले. या बातमीची खात्री करून थेऊर ते नायगाव पेठमार्गे उरुळी कांचन रेल्वे लाईन पलीकडे रस्त्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला.

 

बातमीदारांनी संगितल्याप्रमाणे सदर पांढऱ्या रंगाची कार आल्यावर पथकाने गाडी ताब्यात घेतली असता, या गाडीत दोन व्यक्ती बसलेल्या आढळलेल्या. तसेच गाडीतील डिकीमध्ये पांढऱ्या रंगाचे पोते मिळून आले पोत्यात असलेला पदार्थ गांजा असलेची खात्री झाल्यावर तानाजी शंकर डुकळे (वय 29वर्षे, रा कोलवडी माळवाडी ता हवेली जि पुणे) आणि शिवाजी शंकर डुकळे (वय वय 31 वर्षे, रा कोलवडी माळवाडी ता हवेली जि पुणे) यांना ताब्यात घेतले असता हा गांजा विक्रीसाठी आणला असल्याचे सांगितले. या आरोपीकडून एका पांढऱ्या रंगाचे गोणी 28 किलो वजनाचा गांजा नावाचा अंमली पदार्थ किंमत रुपये ४लाख 20 हजार व एक पांढऱ्या रंगाची मारुती सुजूकी कंपनीची स्विफ्ट डिझायर नोंदणी क्र एम एच 12 क्यू ए ४४७९ किंमत रुपये 4लाख असा एकूण ८लाख 20 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी इन डी पी एस ऍक्ट कलम ८(क) २० (क) नुसार दाखल करण्यात आला असून आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपास कामी लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

ही कारवाई पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, अपर पोलिस अधिक्षक विवेक पाटील, हवेली उपविभागीय अधिकारी सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट तसेच पो.उप निरीक्षक शिवाजी ननावरे, सहा पो फो दत्तात्रय गिरमकर, पो हवा राजेंद्र पुणेकर, पो हवा उमाकांत कुंजीर, पो हवा महेश गायकवाड, पो हवा निलेश कदम, पो ना विजय कांचन, पो ना जनार्दन शेळके, पो ना राजू मोमिन, पो कॉ धिरज जाधव यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here